यवतमाळ सामाजिक

न. प. शाळा क्रमांक 2 राष्ट्रीय बालिका दिन व कायदेविषयक ज्ञानदान शिबिर संपन्न

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

न. प. शाळा क्रमांक 2 राष्ट्रीय बालिका दिन व कायदेविषयक ज्ञानदान शिबिर संपन्न

स्थानिक नगरपरिषद शाळा क्रमांक 2 घाटी येथे घाटंजी शहराचे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश साहेब यांच्या उपस्थितीत दिनांक 24/01/ 2023 रोजी राष्ट्रीय बालिका दिन व कायदेविषयक ज्ञानदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण पडलवार सर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. न्यायाधीश श्री.ए.ए .उत्पात साहेब व श्री. ए. ए. कळमकर साहेब उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये बालिका दिनाचे औचित्य साधून मा. श्री. उत्पात साहेब यांनी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार, बाल गुन्हेगारी व बालकामगार इत्यादी बाबत कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच मा. न्यायाधीश श्री. कळमकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले. शालेय परिसराला लागूनच न्यायालय असल्यामुळे त्यांनी शाळेत राबविण्यात येत असणाऱ्या विविध उपक्रमाचे व शालेय परिसर स्वच्छतेचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी श्री. लखन आडे तसेच शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु. वेणूताई मेश्राम, कु. वृषाली अवचित, सोनाली पेटेवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय गोलर, श्री. कृष्णा मडावी, श्री. वसंत सीडाम, श्री. तुषार बोबडे, श्री. नरेंद्र राठोड, सेवक नारायण डहाके व कांचनताई मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वसंत सिडाम यांनी केले .

Copyright ©