यवतमाळ सामाजिक

दोन दिवसांमध्ये नाम फलकाचे विटंबन करणाऱ्या व्यक्तीस न पकडल्यास जेलभरो आंदोलन. प्रा डॉ मिनाक्षी सावळकर. 

दोन दिवसांमध्ये नाम फलकाचे विटंबन करणाऱ्या व्यक्तीस न पकडल्यास जेलभरो आंदोलन. प्रा डॉ मिनाक्षी सावळकर. 

ढाणकि येथील चर्मकार समाजाच्या संत रविदास महाराज यांच्या नाम फलकाला अज्ञात इसमाने चप्पल ची माळ घालून विटंबना केल्या बाबत दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी जाहीर निषेध करण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन डॉ प्रा मिनाक्षि सावळकर पानझाडे अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय मजदूर कामगार इंटक यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये गावातील समस्त चर्मकार बांधव आणि नगर वरून आलेले संजय खामकर गुरु रविदास विचार मंच अध्यक्ष बुलढाणाहून आलेले लक्ष्मणराव भुमरे एके परिषदेचे माजी वाशिम अध्यक्ष वसंतराव धाडवे उपाध्यक्ष एके परिषद तसेच यवतमाळ चे विजयराज शेजेकर बामसेफ आणि ढानकी येथील समस्त चर्मकार बांधव यांच्या उपस्थितीमध्ये संत रविदास यांच्या नाम फलकाला विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला ताबडतोब अटक होण्यासाठी जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळेस ढाणकी बिटरगाव येथील ठाणेदार बोस यांनी सर्व चर्मकार समाजांना दोन दिवसात समाजकंटकाला पकडून देण्यासाठी लेखी आश्वासन दिले चार वाजता पासून तर रात्रीचे आठ वाजेपर्यंत चार तास ढाणकी येथील पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन मीनाक्षी सावळकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आले दोन दिवसात या समाजकंटकाला अटक न झाल्यास ताबडतोब जेलबरो आंदोलन समाजासोबत घेणार असे जाहीर आव्हान मीनाक्षी सावळकर यांनी केलेले आहे,

Copyright ©