यवतमाळ सामाजिक

कराटे स्पर्धेत आचल गोडे सुवर्ण पदकाने सन्मानित

कराटे स्पर्धेत आचल गोडे सुवर्ण पदकाने सन्मानित

जिल्हा क्रिडा संकुल, नांदेड येथे दिनांक 22 ते 24 जानेवारी 2023 कालावधीत चालु असलेल्या

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय वुशू क्रिडा स्पर्धा 2022-23 मधे स्पोर्ट्स मार्शल आर्टस् रेगुलर ट्रेनिंग सेंटर ची खेळाडु कु.आचल नरेश गोडे हिने अमरावती विभाग संघातुन सहभागी होऊन मुलींच्या 19 वर्षे आतील वयोगटामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून जिल्ह्याचे तसेच विभागाचे नाव उंचावले आहे.ती तिच्या यशाचे श्रेय स्पोर्ट्स मार्शल आर्ट्स रेगुलर ट्रेनिंग सेंटर चे मुख्य प्रशिक्षक मनोज झाडे , सहप्रशिक्षक सुदर्शन चव्हाण, सतिष चव्हाण, भुमिका गोडे तसेच आपल्या आई वडिलांना देते. तिला स्पर्धेकरिता यवतमाळ वुशू संघटनेचे अध्यक्ष आनंद भुसारी तसेच सचिव गोपाल घोडमारे सरांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या कार्याबद्दल मार्शल आर्टस् क्रिडा क्षेत्रातील संजय कोल्हे , विनोद खोडकुंभे , रोहीत केवारकर, ऋषीकेश बन्सोड हितेश अक्कलवार , विजय सालोडे सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल चे दिनेश पवार आदींनी तिचे कौतुक केले तसेच भावी जीवनातील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Copyright ©