यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र गवळी समाजा कडून सत्कार सोहळा सपंन्न

महाराष्ट्र गवळी समाजा कडून सत्कार सोहळा सपंन्न

महाराष्ट्र गवळी समाज साघटने कडून नुकताच सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

या वेळी यवतमाळ महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष अशोकजी भाले यांचे अध्यक्षतेखाली या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख जिल्हा अध्यक्ष नारायणराव पुलाते हे होते समाजातील गुणवंत विद्यार्थी चि.सनंदन विवेक उन्हाळे हा अमरावती विद्यापीठाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग या विभागातुन ६ वा मेरीट आल्याबद्दल यवतमाळ जिल्हा गवळी समजा तर्फे सत्कार करण्यात आला तसेच यवतमाळ जिल्ह्यातील गवळी समाजातील महिला सौ.सुषमाताई बाविस्कर ( लंगोटे )यांची घाटंजी तालुका ठाणेदार म्हणून पदोन्नती देण्यात आली, यांच्या विषयी समजाला अभिमान आहे,गवळी समाज हा आज पर्यंत दऱ्या खोऱ्यात राहून आपली उपजीविका करीत होता समाजाचे नाम मात्र सरकारी सेवेत आहे त्यांचा समाजाला अभिमान आहे म्हणूनच त्याबद्दल गवळी समाजा तर्फे सत्कार करण्यात आला

या वेळी यवतमाळ जिल्हा माजी सचिव संतोष भाऊ डोईजड,जिल्हा कार्याध्यक्ष अनिलभाऊ चावरे, जिल्हा सदस्य शंकर भाऊ माटे, गजानन झाडे, कीशोरभाऊ डोईजड, बबनराव चौधरी, गजानन डोईजड, कीशोरभाऊ कटेकर, ऐकोतखाणे, विवेक ऊन्हाळे, ओंकार चेके,व समाजातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन यवतमाळ जिल्हा सचिव दिपक राम लंगोटे यांनी केले

Copyright ©