यवतमाळ सामाजिक

फहीम सरकार हस्ते सुनिल चव्हाण सन्मानित

फहीम सरकार हस्ते सुनिल चव्हाण सन्मानित

जिव्हाळा कला संच व बहुउद्देशीय संस्था यवतमाळ जय साई नटराज नाट्य कला व संस्कृतिक संस्था औरंगाबाद व वेद फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शूरवीर योद्धा सर सेनापती संताजी घोरपडे विचार संमेलन व एकाच विचार सरणीतून प्रतिभेच्या प्रांतात राष्ट्र वैभावात भर पाडण्यासाठी धडपडणाऱ्या कार्य वीरांचा कौतुक सोहळा दि.21 जानेवारी 2023 ला छ.शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे संमेलनाअध्यक्ष हैदराबाद येथील साऊथ फिल्म इंडस्ट्री चे डायरेक्टर फहीम सरकार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेता विजय मानवत कार . प्रा. उल्हास प्रभू देसाई व सौ.रजनी ताई शिंदे हे होते पाहुणे मंडळी च्या हस्ते प्रसिध्द गायक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव तह.आर्णी जी. यवतमाळ यांना सोशल युथ आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले या वेळी सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरूष च्या आवाजात गीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले या वेळी सभागृहात बरीच रसिक मंडळी हजर होती.

Copyright ©