यवतमाळ सामाजिक

राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित.  तालुकाध्यक्षपदी महेश शेंडे तर सचिवपदी राष्ट्रपाल भोंगाडे

राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठित. तालुकाध्यक्षपदी महेश शेंडे तर सचिवपदी राष्ट्रपाल भोंगाडे

स्व.पि.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ शाखा राळेगाव तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून महेश वसंत शेंडे यांची तालुकाध्यक्षपदी तर सचिव पदी राष्ट्रपाल भोंगाडे यांची सर्वानुमते निवड झाली.
स्थानिक विश्रामगृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ.कैलाश वर्मा होते. ग्रामिण पत्रकार दिनाचे औचित्य साधून नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तालुकाध्यक्ष पदी महेश शेंडे, सचिव पदी राष्ट्रपाल भोंगाडे तर सहसचिव म्हणून गणेश गौळकार, उपाध्यक्ष पदी रामुजी भोयर,मनोहर बोभाटे कोषाध्यक्ष म्हणून सचिन राडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी राळेगाव तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्रकाश मेहता, डॉ. के. एस. वर्मा, मावळते अध्यक्ष राजेश काळे, सचिव फिरोज लाखाणी, प्रा. अशोक पिंपरे, मोहन देशमुख, मंगेश राऊत, महेश भोयर, शंकर वरघट, दीपक पवार, गजू ठुणे, विशाल मासुरकर, गुड्डू मेहता, रणजीत परचाके, अरविंद तेलंगे, रितेश भोंगाडे, शालीक पाल, विलास साखरकर, विनोद माहुरे, प्रमोद गवारकर, मंगेश चौरडोल, संजय दुरबुडे, प्रविण गायकवाड, राजू काळे, विकास ठाकरे, जावेद पठाण, शंकर जोगी, विनोद चिरडे, गजानन तुमराम, शैलेश आडे, आशिष मडकाम, धीरज खेडकर, अजीज शेख, श्रीकांत कवाडे,संदीप लोहकरे, दिनेश सराटे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Copyright ©