यवतमाळ सामाजिक

ग्रामीण पत्रकार दीन साजरा

ग्रामीण पत्रकार दीन साजरा

ग्रामीण पत्रकारांचे जनक
स्वर्गीय ‘ पी. एल. सिरसाट ‘ यांनी सर्व प्रथम ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळवून देण्याकरीता जिल्हास्तरावर ग्रामीण पत्रकार संघ स्थापन केला. त्यानंतर त्याचे रूपांतर राज्य स्तरावर केले. व एक ग्रामीण पत्रकारांचे वट वृक्ष तयार झाले,पत्रकारांवर अन्याय झाला तर व्यक्तिगत भेट घेणे, कुटुंबातील सर्वांचे समाधान करणे, व प्रसंगी अन्याय निवारण करण्याकरीता संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणे असा हा खंदा नेता आपल्यातून सात वर्षांपुर्वी निघून केला. त्याच अनुषंगाने दिनांक 21 जानेवारी ला सातव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ ‘ग्रामीण पत्रकार दिन ‘ म्हणुन अभिवादन करण्यात येत आहे .हा कार्यक्रम यवतमाळ जिल्हा कार्यालयात आयोजित करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी शिवसेनेच्या कल्पना ताई दरवई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके,जिल्हा उपाध्यक्ष पवन धोत्रे,सचिन चौधरी,सतीश पटेल,महेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Copyright ©