यवतमाळ सामाजिक

बिगर ७/१२ शेतकरी संघटनेच्या वतीने जाब विचारो आंदोलन

बिगर ७/१२ शेतकरी संघटनेच्या वतीने जाब विचारो आंदोलन

यवतमाळ ः शासनाकडून स्वातंत्र विद्युत पुरवठा, सुव्यवस्थित रस्ते, स्वतंत्र शौचालय, पक्के घरकुल मिळण्याबाबत वेळोवळी शासनाकडून आदेश निर्गमित केले जातात. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लाखो रुपयाच्या जाहिराती मंत्र्यांचे फोटो छापून प्रकाशित करण्यात येतात परंतु फासे पारधी बेड्यावर साधी जलजोडणी होत नाही याकरिता बिगर ७/१२ शेतकरी संघटनाच्या वतीने जाब विचारो आंदोलन करण्यात येण्याचा ईशारा बिगर ७/१२ शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.

चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी करोडो रुपये खर्च केल्या जाते परंतु फासे पारधी आजही घरकुल व जलजोडणी पासून वंचित राहत आहे. घाटंजी तालुक्यातील शिरोली फासे पारधी तांड्यावर जलजोडणीच्या उपक्रमातून वगळण्यात आले आहे. या संदर्भात पिण्याच्या पाण्यासाठी नळ व स्वतंत्र शौचालय मिळावे याकरिता सौ. मिरा घोसले यांनी सन २०१७ पासून लेखी स्वरुपात जिल्हा परिषदेला तक्रारी केल्या आहे. पाठपुरावा करुन सुद्धा फासे पारध्यांना न्याय मिळाले नाही त्यामुळे समाजामध्ये तिव्र असंतोष पसरला असून बिगर ७/१२ शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वात लवकरच जाब विचारो आंदोलन जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येणार असल्याचा ईशारा बिगर ७/१२ शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार, सामाजिक कार्यकर्ता सौ. मिरा दिलीप घोसले, श्रीमती रेणुका पवार यांनी केले आहे.

Copyright ©