यवतमाळ राजकीय सामाजिक

वडगाव (गाढवे)येथे भव्य कबड्डीचे प्रेक्षणीय खुले सामने प्रसंगी बक्षीसांची जंगी लूट-

बोरी अरब – प्रतिनिधी
ग्रामीण भागातील तरुणांनी खेळ आणि क्रीडा करिता पुढे यावे, तथा युवकांच्या सदैव समस्येचे निराकरण करण्याकरता मी कटिबद्ध.असुन शैक्षणिक आरोग्य तथा क्रीडा संदर्भात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठेही अडचण आली तर तात्काळ मी आपल्या सोबत असून आपल्या समस्येचे निराकरण केल्याशिवाय राहणार नाही हा माझा संकल्प आहे.
.*संतोष ढवळे* *(शिवसेना जिल्हा प्रमुख यवतमाळ)

जय नखी पुर माऊली क्रीडा मंडळ, वडगाव (गाढवे) तालुका दरव्हा, जिल्हा यवतमाळचे वतीने कबड्डीचे भव्यप्रेक्षणीय खुले सामन्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 13.1.2023 ला संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे *उद्घाटक माननीय संतोष ढवळे* (जिल्हा प्रमुख यवतमाळ) यांचे हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून -रवी गझलवार ( शिवसेना तालुका उपप्रमुख) विनोद भोयर(सरपंच), पंजाब जाधव( उपसरपंच), मनोज खोडे( माजी उपसरपंच), आशिष सावंकार, विनोद नेमाने ( ता संघटक),कोंडेश्वर खडगी( मा.उपसरपंच बोरी), प्रदीप मेश्राम,पंडित तायडे, विकी गझलवार (ता युवासेना प्रमुख), नासिर मन्नस, शाहरुख मन्नस, दिवाकर राव जाधव ( मा सरपंच) विक्रम राठोड, ज्ञानेश्वर टोने, मंगेश ढोले, ओमकार राऊत, देवानंद राठोड, राजू लंकेपिल्लेवार, प्रदीप बावणे, आदी मान्यवर उपस्थित होते, जय उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे म्हणाले,
*वडगाव (गाढवे)येथे भव्य कबड्डीचे प्रेक्षणीय खुले सामने प्रसंगी*- बक्षीसांची जंगी लूट- होत असुन या ठिकाणी जे नखी पुरी माऊली क्रीडा मंडळ, वडगाव (गाढवे) यांच्या वतीने अत्यंत सुरेख असे प्रेक्षणीय कबड्डीच्या खुल्या सामन्याचे आयोजन आपण केले. असून”
ग्रामीण भागातील तरुणांनी खेळ आणि क्रीडा करिता पुढे यावे, तथा युवकांच्या सदैव समस्येचे निराकरण करण्याकरता मी कटिबद्ध.असुन शैक्षणिक आरोग्य तथा क्रीडा संदर्भात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठेही अडचण आली तर तात्काळ मी आपल्या सोबत असून आपल्या समस्येचे निराकरण केल्याशिवाय राहणार नाही हा माझा संकल्प आहे. अशाप्रकारे मी सदैव आपले पाठीशी असल्याचे संतोष ढवळे म्हणाले.
यावेळी बक्षिसांची भव्य लुट करण्यात आली.यात प्रथम बक्षीस एकवीस हजार, द्वितीय बक्षीस पंधरा हजार, तृतीय बक्षीस दहा हजार चतुर्थ बक्षीस 7000 , याप्रमाणे बक्षिसांची भव्य लुट या सामन्यात झाली. एवढी बक्षीस देणारे दाते यामध्ये – मनोज खोडे अमोल भेंडे महेंद्र शहाणे नरेंद्र जाधव शाहरुख अमीन मलनास नसीर्जी मला प्रदीप बावणे तथा बाबुरावजी कोडे विद्यालय यांच्या वतीने विविध बक्षीस देण्यात आली.

Copyright ©