यवतमाळ राजकीय सामाजिक

आमदार मदनभाऊ येरावार मित्रपरिवारां कडून सामाजिक सेवा उपक्रम,

यवतमाळ प्रतिनिधी

पोलीस प्रशासन यवतमाळच्या वतीने यवतमाळ शहरात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे 302 पदाकरिता 22 दिवसात 29000 तरुणांकडून भरती करिता शारीरिक मैदानी चाचणी घेतल्या जात आहे. ही भरती जिल्हा पोलीस कवायत मैदान दारव्हा रोड यवतमाळ येथे होत असून येणारे युवक हे जिल्यातून व संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातुन येत असून मा जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भुतडा यांच्या सूचनेनुसार त्यांच्या करिता एक मदतीचा हात म्हणून त्यांची व्यवस्था होत नसल्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने आमदार मदनभाऊ येरावार मित्र परिवाराच्या वतीने त्यांना चहा,बिस्कीट आज सकाळी 3:30 वाजता पासून वाटपास सुरवात झाली आहे.या व्यवस्थेमध्ये आज उपस्थित असलेले रेखाताई कोठेकर प्रदेश उपाध्यक्ष, मायाताई शेरे जिल्हाध्यक्ष महिला, अजयजी राऊत नगरसेवक,किर्तीताई राऊत नगरसेविका,शुभांगी ताई हातगावकर नगरसेविका,प्रियांका ताई भवरे नगरसेविका, नितीन गिरी नगरसेवक,विजय खडसे नगरसेवक,मनोजभाऊ मुधोळकर नगरसेवक, चेतनभाऊ भवरे,बंटी श्रीवास युवा मोर्चा जिल्हा सचिव,योगेश पाटील जिल्हा सचिव , उमेश राठोड शहर सोशल मीडिया,उपस्थित होते

Copyright ©