यवतमाळ सामाजिक

सिध्देश निमोदिया यांचा गौरव

यवतमाळ :

समता मैदान पोस्ट ग्राउंड येथे दि. १३ ते १५ जानेवारीपर्यंत सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालय द्वारा संचालित बंजारा आर्ट अँड गार्मेंट प्रदर्शनी २०२३ मध्ये टिंबरमर्चंटअसोसिएशन चे सचिव प्रविण निमोदिया यांचे चिरंजीव सिद्धेश प्रविण निमोदिया एस.एस.एम.ईमध्ये स्किल डेव्‍हलपमेंट प्रोग्राम मध्ये उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल सन्मान चिन्ह व मानपत्र देवून कार्यक्रमाचे अध्यक्ष बंजारा समाजाचे महंत गुरु श्री. बाबुसिंग महाराज (पोहरादेवी) तर विशेष अतिथी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पी.एम. पार्लेवार संचालक एमएसएमई नागपूर, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे किशोर बाबू दर्डा, एम.आयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा, सचिव आनंद भुसारी, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, डॉ. राजेंद्र सांभे प्रकल्प अधिकारी, ममता राठोड, उपमुख्याधिकारी न. प. यवतमाळ, निलेश निकम जनरल मॅनेजर, डी.आयसी राहुलकुमार मिश्रा, असिस्टंट डायरेक्टर नागपूर आदी उपस्थित होते.
सिध्देश निमोदीया यांनी एका महिन्यातच कालावधीत स्किल डेव्‍हलपमेंट प्रोग्राम इंजि नम्रता सांभे यांचे मार्गदर्शनात पुर्ण केले. त्याबद्दल मान्यवरांचे शुभहस्ते सिध्देश निमोदिया यांचा सत्कार करण्यात आला. सिध्देश निमोदिया यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Copyright ©