यवतमाळ शैक्षणिक

शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे खेळाडूचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश….

स्पोर्ट कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी तिरुपती मंगल कार्यालय, वणी येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे खेळाडू यांनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून पदके पटकावली त्यात सर्वेश रवी शाहू, कौशल नंदकिशोर येन्नरवार, आपला उत्कृष्ट प्रदर्शन दाखवुन सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच ,प्रथमेश सुभाष काकडे, हिताशं स. रेकवार यांनी रजत पदक, सृष्टी स. रेकवार, यांनी कांस्य पदक मिळविले. तसेच काता या प्रकरात जय कान्तेश्वर जुनघरे सुवर्ण व प्रथमेश सुभाष काकडे कास्य पदक प्राप्त केले. युवान प्रशांत जयस्वाल ,जन्मजय उमेश इंगोले, समर्थ चंद्रशेखर चौधरी, यश कृषभ दरवेकर व हेमंत गणेश उईके यांनी आपला सहभाग नोंदविला. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेतील असुन हे विद्यार्थी शंकरलाल कोठारी विद्यामंदिर समर्थवाडी यवतमाळ येथे प्रशिक्षण घेतात. या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक रोहित केवारकर, अजित मिश्रा,हेमंत उईके व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ),श्रीमती नंदाजी. खुरपुडे(जिल्हाक्रीडाअधिकारी यवतमाळ),ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी.एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े,विनोद खोडकुंभे,अश्विनी उईके, रविन्द्र महानुर व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©