यवतमाळ सामाजिक

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची व स्वामी विवेकानंद यांची जयंती. 

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची व स्वामी विवेकानंद यांची जयंती. 

आज राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने नेहरू युवा केंद्र व TDRF (टार्गेट डीझास्टर रिस्पॉन्स फोर्स) यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय युवा दिवस समारोह” या कार्यक्रमाचे आयोजन करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्यांच्या समजापयोगी कार्याची दखल घेण्यासाठी त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी रोहित राठोड यांचा हि विशेष सन्मान करण्यात आला त्यांचे मते आपल्या समाजात वर्षानुवर्षे कामे करणारी लोकं आहेत परंतु त्यातल्या त्यात आपल्याला कुणी सन्मानित करेल याची कल्पनाच नव्हती परंतू आपल्या ह्याच समाजात चांगल्या गोष्टीला दाद देणारी माणसे पण आहेत याची आज प्रचिती आली. अस मत त्यांनी व्यक्त केले

मी माझा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सांभाळून गाव, निसर्ग आणि युवकांसाठी माझं गाव फाउंडेशन व माऊली स्पोर्ट्स क्लब, बोथ बोडण च्या माध्यमातून समाजात निसर्ग प्रेम, युवकांना खेळाबद्दल चे मार्गदर्शन व सहकार्य, गावात चांगले वातावरण, स्वच्छता, विकासात्मक कामे, गावाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम फाऊंडेशनच्या सहाय्याने करतो. हीच गोष्ट TDRF चे संचालक मा. हरिश्चंद्रजी राठोड यांनी हेरली व माझ्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. धर्मेंद्र जी(विवेकानंद केंद्र, यवतमाळ) या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून

मा. श्री. शिवाजी मगर , (तहसीलदार, नेर), मा. केशव गड्डापोड (गटविकास अधिकारी, यवतमाळ), मा. सारंग मेश्राम (जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, भारत सरकार), मा. हरिश्चंद्र राठोड (संचालक,टी. डि. आर. एफ.) व TDRF ची सगळी टीम व मोठ्या संख्येने समाजासाठी झटणारे लोक उपस्थित होते.

या समारोहामध्ये जाते वेळी मन भारावून गेले होते

मा.हरिश्चंद्र राठोड व TDRF च्या सर्व टीमचे मनापासून या वेळी आभार वेक्त करण्यात आले.

Copyright ©