यवतमाळ सामाजिक

राजमाता जिजाऊ व राष्ट्र निर्माते स्वामीजी हेच खरे युवकांचे प्रेरणास्रोत “-प्रा. डॉ.अनंतकुमार सूर्यकार

यवतमाळ :

श्री गुरुदेव सेवा मंडळ, ( तरोडा ),  मंगरूळ ग्रामवासियांच्या वतीने १२ जानेवारीला ‘ राष्ट्रमाता, राजमाता , मांसाहेब जिजाऊ यांची ४२५ वी व राष्ट्र निर्माते स्वामी विवेकानंद यांची १६० वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम ‘ सामुदायिक प्रार्थना ‘, अर्जी पद, नामधून, नामजप, शांती पाठ व आत्मचिंतन घेण्यात आले .
मांसाहेब जिजाऊनी छत्रपती शिवराय घडविले, पराक्रमाचे बाळकडू रामायण, महाभारत या नीती प्रधान महाकाव्यातून दिले. तसेच युवकांना स्वामीजींनी जगण्याचा महामंत्र दिला. अंधविश्वास हा भारतीयांचा मोठा शत्रू आहे . असे सुतोवाच संजय कांबळे यांनी प्रसंगाला अनुरूप केले.
जिजाऊ या संघर्षशील व्यक्तीमत्वाच्या धनी होत्या. पती प्रेम व पुत्र प्रेम हा त्यांच्या जीवनाचा प्रमुख आधारवड होता. मां जिजाऊने गर्भसंस्कार करून दिव्य प्रतिभेचा , महाप्रतापी तसेच धुरंधर राजनीतीज्ञ पुत्राला जन्म दिला आणि एका विद्वान व पराक्रमी नातवावर शिस्त व आदर्श संस्कार करून छत्रपती संभाजी राजे निर्माण केले. युवकांनो , ध्येयवेडे बना आणि मागे वळून कधी बघू नका , तुम्हाला अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातून या भारताची नवं निर्मिती करावयाची आहे. ही स्वामीजींची संकल्पना होती. युवकांनो , मांसाहेब आणि स्वामीजी हेच आपल्या जीवनाचे खरे प्रेरणास्रोत व शिल्पकार आहेत .असे गौरवोद्गार प्रो. डॉ.अनंतकुमार सूर्यकार यांनी दोन्ही महाविभूतींच्या जयंतीनिमित्त व्यक्त केले.
उपस्थितांनी महाविभूतींच्या प्रतिमांचे पूजन करून दर्शन घेतले.
डॉ अनंतकुमार सूर्यकार, संजय कांबळे,विठ्ठल कोडापे, ताराचंद चव्हाण, नारायण सूर्यकार, मिलिंद ठाकरे,ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, गणेश सोनवणे, रामेश्वर गावंडे, विजय ढोके, सुनील गिरपुंजे, मोहन ठाकरे, दीपक हारे, दत्ता इंगळे, वसंत वनवे, दिगंबर इंगोले, गजानन मोडले, अभय सोनटक्के, अशोक गावंडे, अक्षय सोनवणे, गिरीधर भगत, सुधाकर धोंगडे, सुमित्रा मोडले, राधा मोडले, लखन कोडापे, यश हे जयस्वाल, अवधूत गवळी, पंकज पोहोरकर, साहील खेरे, अर्पित भागडे, मारोती पवूळ, ज्ञानेश्वर मोडले, पंडित काळे, भैय्या जाचक व गावातील बहुसंख्य महिला व पुरुष मंड तरळीं उपस्थित होते.
सूत्रसंचालन अरूण सोनटक्के यांनी तर आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर कोडापे यांनी पार पाडले. राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची समाप्ती झाली.

Copyright ©