यवतमाळ सामाजिक

तालुका कृषी अधिकारी दारव्हा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती अभियान

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 कार्यक्रम संपन्न

 

प्रतिनिधी प्रदीप मेश्राम :

दारव्हा तालुक्यातील .मोजा चाणी कामटवाडा व वारज चे ग्रामपंचायत कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीकरण तृणधान्य 2023 चा कार्यक्रम घेण्यात आला भरड धान्य हे आपले पारंपारिक पोषण युक्त आरोग्यदायी अन्न असून त्याचा आहारातील उपयोग कमी होत आहे त्यामुळे अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो बदलत्या हवामानात ट्रक भरणारी भरड धान्य उत्पादनाच्या दृष्टीने ही दुर्लक्षित आहेत अशा पोषणमूल्य युक्त भरड धान्याचे जागतिक पातळीवर उत्पादन वाढविणेव आहारातील वापर वाढविणे याबाबत जनजागृती करणे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भरड धान्य वर्ष साजरी करणे मागचा मुळ हेतू आहे भरड धान्य मागे उच्च कोटीची पोषणमूल्य असल्यामुळे त्यांना पौष्टिक तृणधान्य असेही म्हणतात ज्वारी बाजरीची भाकरी नाचणीचे मुद्दे बाजरीची खिचडी नाचणीचे मुद्दे बाजरीची खिचडी नाचणी डोसा रागीची लापशी वरई पुलाव असे पदार्थ पूर्वी आरात होते हे सगळे पदार्थ पुन्हा आपल्याला आहारात आणणेगरजेचे आहे बहुतांश भरड धान्याचा पीठ रव्यापासून धिरडे धपाटे थालीपीठ उपमा असे पदार्थ तयार करता येतात आपल्या आहारात भरड धान्य सेवनाने कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम लोह प्रतीने कार्बोदके चे प्रमाण भरपूर प्रमाणात मिळते दैनंदिन आहारात प्रथिनांचे किती महत्त्व आहे हे पी एस बोईनवाड कृषी सहाय्यक कामठवाडा यांनी पटवून दिले यावेळी गावातील शेतकरी संतोष शिंदे सुधाकर भोयर गजानन शहाणे विजय शहाडे नामदेव ठोकळ हरिद्वार जाधव विलास राठोड सुशील ठोकळ रामनाथ खडके सुभाष गव्हाणे राजकुमार डहाणे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©