यवतमाळ राजकीय

आम् आदमी पक्षाची घाटंजी तालुका व शहर कार्यकारिणी गठित.

 

घाटंजी:- आम् आदमी पार्टीचा विदर्भ समिती कडून व वसंतराव ढोके यवतमाळ जिल्हा संयोजक यांचा नेतृत्वात घाटंजी तालुका व शहर कार्यकारिणी शासकीय विश्रामगृह घाटंजी येथे पक्षाचा बैठकीत गठित करण्यात आली. या प्रसंगी वैभव निखाडे यांना तालुका संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली तर अमोल नडपेलवार यांना शहर संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली, तसेच मधुकर सोनुले, सागर राठोड, ऋतिक राठोड, युसुफ भाई, विलन राठोड, विठ्ठलराव जुमनाके, विठ्ठल पवार, लता कलांद्रे, निता राठोड, राम चरडे, विनय खोब्रागडे, आम्रपाल शंभरकर, अमित ढालवाले, अजय टेकाम, रमेश पाटील, गजानन शेंडे, विमल मडावी, ओमप्रकाश डोहळे, दीपक घोलप, संजय प्रतापवर, सागर सम्मनवार, सीमा भोंग, दीपा आगरकर, ईशांत खांडरे, तथागत मानकर, महेश लेदे,अरुण गोहाडे, निखिल खडसे, सुधाकर भोंग यांना पदे देण्यात आली.
येणाऱ्या सर्व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका पक्ष लढवणार असल्याचे लक्षात घेता पक्षाचा ध्येय धोरणावर चर्चा करण्यात आली व पक्षाला बळकटी देण्यासाठी महिला आघाडी, युवा आघाडी, शेतकरी आघाडी, व्यापारी आघाडी, शिक्षक आघाडी अशा महत्त्वाच्या पदांवर पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी पक्षाचे प्रदेश सदस्य नितीन गवळी, जिल्हा संयोजक वसंतराव ढोके, जिल्हा सचिव ऍड.मनीष माहुळकर, जिल्हा कोषाध्यक्ष विलास वाढई, आर्णी विधानसभा संयोजक प्रेमचंद चव्हाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Copyright ©