Breaking News यवतमाळ

द्वितीयवर्षाला असलेल्या विद्यार्थिनीचाआत्महत्येचा प्रयत्न

द्वितीयवर्षाला असलेल्या विद्यार्थिनीचाआत्महत्येचा प्रयत्न

यवतमाळ– येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय वेगवेगळ्या घटनांमुळे सातत्याने चर्चेत राहत आहे आज देखील या महाविद्यालयात द्वितीयवर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गळ्याला गळफास आवळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडल्याने वैद्यकीय महाविद्यालय परिसरात चर्चा उडाली. बघायची गर्दी परिसरात झाली. असून आत्महत्या करण्या मागील नेमके कारण काय? अशी विचारणा आता होऊ लागली आहे. दरम्यान सदर विद्यार्थिनी वैद्यकीय महाविद्यालयातच उपचाराखाली आहे. आई वडिलांच्या उच्च शिक्षणाचा भार मुलांवरती येत असून त्यांना न झोपणारे शिक्षण सुद्धा घेण्यास आई वडील भाग पाडत आहे. याच कारणाने मुले मानसिक दबावांमध्ये राहून शिक्षण घेत असल्याचे निदर्शनात येत आहे.
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय वेगवेगळ्या चर्चेने उथान आले आहे. खून , धमक्या देणे, रॅंकिंग, या सारखे प्रकार अनेक दिवसापासून महाविद्यालयात वाढलेले आहे. अधिष्ठानाचा कुठलाही वचक कर्मचाऱ्यांवरती व विद्यार्थी यांच्यावरती राहिलेला नसून महाविद्यालय हे वाऱ्यावर सोडल्याप्रमाणे झालेले आहे.आज देखील या महाविद्यालयातील द्वितीय वर्षाला शिकत असणाऱ्या कु.कल्याणी रमेश शिवणकर वय 22 या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब लगेच लक्षात आल्याने लगेच तिला मदत मिळाली आणि तात्काळ तिला परावृत करीत अंतर विभागात दाखल केले.यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय चौकशी केली असता सदर विद्यार्थिनी हिला वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यासक्रम न झेपणारा ठरलेला आहे. प्रथम वर्षाला देखील तिला अपयश आले मात्र काही विषय काढल्यानंतर ते द्वितीय वर्षाला प्रवेशबद्ध झाली. मात्र एटीकेटी प्रथम वर्षाचा अभ्यास आणि द्वितीय वर्षाचा अभ्यास यामुळे तिची मानसिकता ढासळली आणि तिने हा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.यापूर्वी देखील तिचा हा प्रयत्न झाला होता मात्र वेळी सगळे सावध झाल्याने तिचा तो प्रयत्न देखील निष्फळ ठरला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करणार असून तपासअंती कारवाई करणार अशी माहिती पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत यांनी दिली.

Copyright ©