यवतमाळ सामाजिक

डांगरगावत वंचित बहुजन आघाडीची एक हाती सत्ता

प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

डांगरगावत वंचित बहुजन आघाडीची एक हाती सत्ता

नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये डांगरगांव येथे वंचित बहुजन आघाडी पॅनलला निर्विवाद बहुमत मिळाले. गेल्या 50 वर्षापासून ग्रामपंचावर असलेली प्रस्थापितांची सत्ता उलथवून गावातील विविध वंचित समाज घटक एकत्र येवून ग्रामपंचाय ची सत्ता हातात घेवून गावातील वंचित घटकाला न्याय देण्याचा संकल्प येथील नवनिर्वाचित सरपंच श्री . प्रकाश दत्तुजी खोडे व उपसरपंच नंदू पांडुरंगंजी अराडे , सदस्या सौ.शारदा रामकृष्ण कुमरे , सौ . वर्षा विजय भगत यांनी केला आहे .10 जानेवारीला सदर निवडीची अधिकृत घोषणा ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मेंढे साहेब यांनी केली . येणाऱ्या काळात ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी एक विकासात्मक कृती आराखडा तयार करण्यासाठी पाऊल उचलन्याचे नवनिर्वाचीन ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी ठरविले . यामध्ये घरकूल , वैयक्तीक सिंचन विहीर , नाली बांधकाम , शोष खड्डे , सिमेंट रस्ते , पांदण रस्ते , जल जिवन मशिन अंतर्गत पाणी टंचाई निवारण , विद्युत पुरवठा नियमित करण्यासाठी प्रयत्न करणे . या व अशा अनेक सार्वजनीक व वैयक्तीक लाभाच्या योजना वंचित घटकाला मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे .
यावेळी संपति बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे , जिल्हा उपाअध्यक्ष पांडुरंग निकोडे , मनोज मुनेश्वर , दादाराव गिणगुले ,गौरव शेंडे व अनेक गावकरी हजर होते .

Copyright ©