यवतमाळ सामाजिक

गोविंद वंजारी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड

गोविंद वंजारी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड

यवतमाळ -: तालुक्यातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या

कोळंबी गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी गोविंद वंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नुकतीच ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.यामध्ये कोळंबीच्या ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदासह सात सदस्य निवडून आले.सरपंचाची थेट जनतेतून निवड झाल्यानंतर उपसरपंच निवडी महत्त्वाची मानल्या जात होती.निवड प्रक्रिया सरपंच शैलेश आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या प्रसंगी गोविंद वंजारी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहिर करण्यात आले.याप्रसंगी कांता सोनवणे, किशोर सुरपाम,गणेश तडसे, बेबी पिंपळकर,शांता सोनवणे,दीक्षा शेलकर हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी गोविंद वंजारी यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Copyright ©