Breaking News यवतमाळ सामाजिक

लाडखेड येथे घराजवळुनच चोरट्यांनी पळवली टाटा एस . गाडी

 

लाडखेड प्रतिनिधी : प्रदीप मेश्राम :

दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथील काल सायंकाळी अकरा वाजता आपले राहते घराजवळूनच चोरट्यांनी मालवाहतूक टाटा एस गाडी घराजवळूनच .चोरून नेली .गाडी . नंबर M H 2 9 T – 5 2 o 2 . असुन मालक दीपक दुधे यांनी आज दिवसभर गाव खेड्यातून शोध काढून यवतमाळ येथे गाडीचा शोध घेतला परंतु आढळून आली नाही अखेर त्यांनी आज सायंकाळी सात वाजता लाडखेड . पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली की माझी गाडी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली चोरट्यांनी गाडी लाडखेड येथील पेट्रोल पंपावर जाऊन रात्री 11 च्या सुमारास डिझेल ही टाकले ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पंपावरील कामगाराने त्या चालकाला विचारले की एवढ्या रात्री गाडी घेऊन कुठे चालला तर त्या चोरट्याने चक्क उत्तर दिले की मी गाडी भंगारात विकायला घेऊन चाललो .गावामध्ये पोलीस स्टेशन असून सुद्धा चोरीच्या घटना लाडखेड गावामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत .यापूर्वी मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर पंप ची चोरी झाली .याकडे लाडखेड पोलिसांचे दुर्लक्ष असून .आठवडाभरापूर्वी पुन्हा चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतातील केबलची सुद्धा चोरी केली .या घटनेमुळे लाडखेड येथील नागरिक तथा शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे लाडखेड पोलिसावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .मोटर पंप चोरीतील तपास अजून पर्यंत लाडखेड पोलिसांनी पूर्ण केला नाही या गंभीर बाबीकडे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी लाडखेड येथील नागरिकाकडून होते . गाडी मालक दिपक दुधे यांचे तक्रारीवरून . लाडखेड पोलीसांनी अझात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे . चोरीचा तपास लाडखेड पोलीस करेल का या कडे लाडखेड आणि परिसरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे

Copyright ©