यवतमाळ सामाजिक

जोश बिझनेस कार्निव्हलचा हजारो नागरीकांनी घेतला आनंद आयोजक जोश च्या टिमचा सत्कार

जोश बिझनेस कार्निव्हलचा हजारो नागरीकांनी घेतला आनंद आयोजक जोश च्या टिमचा सत्कार


यवतमाळ – जोश फाऊंडेशनतर्फे आयोजित आणि जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीद्वारा प्रायोजित चार दिवसीय जैन बिझनेस कार्निव्हल जोशचा सोमवारी समारोप झाला गत चार दिवसांमध्ये या कार्निव्हलला हजारो नागरिकांनी भेटी दिल्या तसेच शेवटच्या दिवशी विक्रमी गर्दी होती.
स्थानिक समता मैदानात जोश बिझनेस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
९ जानेवारीला या कार्निव्हलचा समारोप झाला. या ठिकाणी खाद्य पदार्थांसह विविध वस्तूंचे १२० स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यामध्ये स्थानिक पातळीवर निर्माण केलेल्या वस्तूंचा समावेश होता. या वस्तूंच्या खरेदीसाठी शहरासह जिल्ह्यातून हजारो व्यक्तींनी हजेरी नोंदविली होती. शेवटच्या दिवशी सकल जैन समाजाचे आधारस्तंभ किशोर दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी आयोजकांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष अश्विन धरमसी, मूर्तीपूजक संघाचे सदस्य राजेंद्र खिवसरा, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान मलनस, चंदा कोटेचा, कुसूम दप्तरी, हर्षद छोरिया, राधिका कोठारी, रमेश खिवसरा उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत जोशच्या महिला विंग अध्यक्ष वर्षा तातेड, सचिव शुभम खिवसरा, प्रकल्प अधिकारी अर्पित बोरा, स्नेहल बोरा, दर्पण बोरा, खुशबू भंडारी, रानू झांबड, आरती खिवसरा, ममता बोरा, राजेश गुगलिया, रश्मी बोरा, वैभव गुगलिया, जय बोरा, रूपेश बोरा, शेजल खिवसरा, साक्षी दर्डा, रोहिनी गुगलिया, हेमांशी बुंदेला यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन विजयकुमार बुंदेला यांनी केले तर यावेळी चार पिढ्यांचे साक्षीदार असणारे ज्येष्ठ मंडळी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये कांचनबेन धोराजीवाला, भक्ती बोरा, शांताबाई गुगलिया, कमला खिवसरा, कमला झांबड, नेरबाई रायसोनी, विमला पोकर्णा, चंद्रकला सावला, प्रेमचंद काकलिया, इंदरबाईसा बोरा, मदनबाईसा सुराणा, प्रसन्न कुमार कोठारी, निर्मला प्रसन्न कोठारी, भागचंद तातेड, शांताबाई भागचंद तातेड, गुलाबबाई गांधी, संतोष लुणावत, सुशीला संतोष लुणावत, प्रेमचंद पोकर्णा, सोहन प्रेमचंद पोकर्णा, कमलाबाई दर्डा, टमकूबाई बोरा, देवीबाईसा आचलिया यांचा गौरव करण्यात
आला. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन सौ. आरती खिवसरा व कु. हेमांशी बुंदेला यांनी केले. याप्रसंगी एम.डी. बँड नागपूरच्या बहारदार गाण्याचा कार्यक्रमाचा आनंद नागरीकांनी घेतला.

Copyright ©