यवतमाळ सामाजिक

हिवरी येथे रहाड यात्रा महोत्सवाचा समारोप

हिवरी येथे रहाड यात्रा महोत्सवाचा समारोप

आदिवासी समाजाचे कुल दैवत मानल्या जाणाऱ्या हेंडबा देवीची यात्रा भरते या ठिकाणी दहा फूट हौद खोदून त्या मध्ये एक रात्र वाळलेले खोड जाळण्यात येते त्याचे निखारे करून त्या निखारे असलेल्या हौदाची सकाळी सहा वाजता पूजा करण्यात येते सर्व प्रथम त्या निखाऱ्या वरुन कोंबडीच्या पिलाला सोडण्यात येते,नंतर शेकडो भाविक त्या निखाऱ्यावरून चालत जातात येथील आदिवासी समाज श्रध्ये पोटी या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस गावा मधून भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात,हि प्रथा मागील शेकडो वर्षांपासून सुरू असल्याचे वयो वृध्द यांचे कडून सांगण्यात येत आहे या वेळी महाप्रसाद मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येत असून याचा समरोप माजी जी. प.उपाध्यक्ष शामभाऊ जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी जगलाल बैतवार,राम जयस्वाल, भगवान राऊत,अनता राउत,संदीप खोडकुंभे,अशोक खोडकुंभे,सुभाष मडावी, ओम लोहिया,अनिल गावंडे,विजय धांदे,उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेवराव मडावी,ओंकार कूमरे,मोहन सिडाम,अंबादास कुमरे,सचिन मानकर, वसंत कोहचाडे इत्यादि परिश्रम घेतले.

Copyright ©