यवतमाळ सामाजिक

पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता करावी माजी जि, प, सदस्य प्रकाश भाऊ राठोड

पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता करावी माजी जि, प, सदस्य प्रकाश भाऊ राठोड

सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील येत असलेल्या केळापूर मतदारसंघात असलेल्या सावळी सदोबा येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जि प सदस्य प्रकाशभाऊ राठोड यांनी पत्रकार सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रकाश राठोड मनाले की पत्रकाराचा मान सन्मान करताना मला एवढा अभिमान वाटतो की पत्रकारांनी आज पर्यंत जे लिखाण केले, त्यामुळे अनेक विकास कामे झाली म्हणूनच पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता करावी तेव्हाच सर्कलचा विकास होईल आणि पत्रकार चा मान सन्मान वाढेल ६जानेवारी पत्रकार दिन होता काही कारणास्तव कार्यक्रम घेऊ शकलो नाही, त्यामुळे दोन दिवस लेट का होईना पण मला पत्रकार सन्मान सोहळा घ्यायचा होता त्या अनुषंगाने प्रेस क्लब सावळी संघटनेच्या सर्वच पत्रकाराचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमामध्ये केळझर वरठी येथील जि प शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक पद बहाल केल्याबद्दल आकाश साहेबराव शिवणकर यांचं सुद्धा सत्कार घेण्यात आला, व्हॉइस ऑफ मीडिया आर्णि तालुकाध्यक्षपदी राम पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार घेण्यात आला, निबंध स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकावर कु, प्राची जयदीप चव्हाण हिचा सुद्धा सत्कार करण्यात आला, यावेळी माजी जि ,प, सदस्य प्रकाश भाऊ राठोड धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप माजी जि.प.सदस्य सोनबा भाऊ मगांम , वरील मान्यवरांच्या हस्ते पत्रकाराचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष दुर्गेश कर्णेवार ,उपाध्यक्ष रमेश राठोड ,सचिव योगेश शिवणकर सुरेश पवार, रुपेश खरतडे, राम पवार ,प्रमोद कोट्टावार ,महम्मंद सर्वे जे बी पठाण ,अविनाश चव्हाण, अमित ठाकरे, आसिफ खान ,अमीन चव्हाण, श्रीकांत देशमुख ,सचिन जुनघरे, सुरेश राठोड ,राहुल राऊत ,हिरासिंग राठोड, खुशाल जाधव, चंद्रशेखर जाधव, व इतरही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी विजय संमगिर ,राजूभाऊ राऊत, भास्कर पाटील जगताप, राजू पंजवनी, शंकर जाधव. बेबीबाई दरोडे असे अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Copyright ©