यवतमाळ शैक्षणिक

समर्थ विद्यालय घाटंजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी

प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

समर्थ विद्यालय घाटंजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी

इतिहासामध्ये पहिल्यांदाच नगरपरिषद शाळा क्र. 2 द्वितीय क्र.प्राप्त

पंचायत समिती घाटंजी व श्री समर्थ विद्यालय घाटंजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक सहा ते सात जानेवारी या दोन दिवसांमध्ये समर्थ विद्यालय घाटंजी येथे पार पडली या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये नगरपरिषद घाटंजी शाळांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच नगरपरिषद शाळा क्रमांक 2 घाटी घाटंजी येथील विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या प्रतिकृतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होण्यासाठी वापरात येणाऱ्या आणि सौर ऊर्जेवर कार्य करणाऱ्या प्रयोगाचे सादरीकरण वर्ग 8 चा विद्यार्थी वेदांत गोडे व वर्ग 6 चा विद्यार्थी कृष्णा गड्डमवार या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांना श्री नरेंद्र राठोड व कुमारी वृषाली अवचित या सहाय्यक शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं, तसेच विद्यार्थ्यांची तयारी प्रयोगाचे नियोजन या सर्वांसाठी मुख्याध्यापक श्री अरुण पडलवार यांनी प्रयत्न केले सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते

Copyright ©