यवतमाळ सामाजिक

महानुभवांचा ज्ञानसूर्य मावळला

महानुभवांचा ज्ञानसूर्य मावळला

महानुभाव पंथाच्या ज्ञान प्रबोधनाची ज्ञानगंगा सतत प्रवाहित राहावी यासाठी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तन मन धनाने झटणारे विद्वतरत्न ज्ञानभास्कर महानुभाव पंथाचे संत शिरोमणी गुरुवर्य श्री वर्धनस्थ बिडकर बाबाजी शास्त्री रणाईचे. (अध्यक्ष अखिल विश्व महानुभाव परिषद )

महानुभाव पंथातील उपाध्य कुळातील सहा आम्नाय महंतापैकी कुलाचार्य म्हणून श्री वर्धनस्थ बिडकर ह्या महंती प्रतिष्ठेवर वयाच्या 50 व्या वर्षी सव्वाशे शिष्य गाद्या आणि नातू गाद्यांच्या साक्षीने विराजमान होत दैदिप्यमान अश्या पुर्व परंपरेला 32 वे आचार्य म्हणून लाभले. बाबाजींच्या सानिध्यात सव्वाशे साधक मंडळी असून महाराष्ट्रभर हजारोंच्या संख्येने त्यांचा त्यांचा अनुयायी वर्ग आहे . बाबांजींच वास्तव्याच ठिकाण म्हणजे रणाईचे. कैवल्यवासी गुरुवर्याची स्मृती स्मरणात ठेवून त्यांनी रणाईचे येथे आश्रम उभारून त्यास प्रणवाश्रम नाव ठेविले. बीड, अमरावती जवळ चांदुर बाजार, पैठण जवळ पाचोड,तर नाशिक येथे मोरवाडी, या ठिकाणीही पंथीयशाखा प्रस्थापित केल्या.आपल्या संपूर्ण जीवनात धर्मप्रचार आणि प्रसार कार्य करीत असताना समाजात नीतिमूल्ये कशी अंकुरित करता येतील याकडे बाबांचं विशेष लक्ष असायचं,त्याच माध्यमातून व्याख्यानसत्र , संस्कारशिबि र,आणि प्रबोधन पर प्रवचन,तत्वज्ञान बाबा समाजात पेरीत होते.श्री क्षेत्र रूध्दपुर येथे असताना तेथील शालेय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना संस्काररुपी मार्गदर्शन,सामाजिक विकास कार्ये यावर सुधारणा घडवून आणली.बाबा म्हणजे संस्कृतचे प्रकांड पंडित;शास्त्री पदवी नंतर त्यांनी बरीच वर्ष श्री चक्रधर संस्कृत महाविद्यालय विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षक म्हणून अध्यापन केले.अनेकाना phd पदवी मध्ये विशेष मार्गदर्शन बाबांचे होते. आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि ब्रह्मविद्येच्या व्यासंगाने प्रत्येकाच्या मनात बाबान विषयी आपुलकी निर्माण झाली त्याच स्नेहापोटी बाबांच्या सुश्रुषा विधीला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
बाबाजिंच्या पश्चात आश्रमस्थ तसेच आयुयायी परिवार पोरका भासत आहे.श्री गुरुवर्यांच्या देहावसानानंतर प.पू. श्री निलेश दादा, बबलु दादा, अप्पू दादा, विनय मुनी,विशाल दादा,हर्षल शास्त्री, प्रभाताई बिडकर यासह सर्वच अश्रमस्थ तसेच सव्वाशे शिष्यगाद्या नातु गाद्या शोकसागरात लीन आहेत.बाबांच्या कर्तृत्वाला स्मरणात ठेवीत त्यांच्या कार्याला अनुकरणात उतरवून साधनाप्रती आवड साध्या प्रती ओढ ठेवूया.

Copyright ©