यवतमाळ सामाजिक

नैसर्गीक चिकित्सा शिबिराचे आयोजन

नैसर्गीक चिकित्सा शिबिराचे आयोजन

यवतमाळ, ता. ७ : अ.भा. मारवाडी महिला मिडटाऊन शाखा यवतमाळ व माहेश्वरी मंडळ, महेश सेवा समितीच्या संयुक्त माध्यमाने कंचन सेवा संस्थान उदयपुर यांचे गुडघा व कमरीत दु:खणे यांवर नैसर्गिक चिकित्सा शिबिरचे आयोजन ११ जाने. ते १४ जानेवारीपयंत महेश भवन यवतमाळ येथे होत आहे.
या शिवारात गुडघ्यांचा त्रास जसे ग्रीस कमी होणे, लिगामेन्ट कमजोर होणे, सुजणे, उठने व बसणे त्रास होणे, मांडी घालून खाली बसण्यास त्रास होणे, चालल्यावेळेस कडकड आवाज येणे, हड्डी घासणे, कमरीत दुःखणे, जसे मनक्यात गॅप, बसताना झोपतांना दुःखणे, सुजन, झोप कमी येणे, उभे राहिल्यासर खूप त्रास होणे अशा रोगावार बिना ऑपरेशन नैसर्गिक चिकित्सा पद्धतीने उपचार केला जाईल चार दिवसीय शिबीरात शुल्क फक्त ३०० रुपये राहील. शिबीराची वेळ रोज सकाळी ९ ते संध्या. ५ वाजेपर्यंत राहील. या शिबीरांचा लाभ सर्वांनी जास्तीत- जास्त घ्यावा अशी विनंती संयोजीका पुनमताई जाजू, अध्यक्षा पुष्पा व्होरा, सचिव वनिता भरूट, प्रकल्प अधिकारी विद्या दुप्पड, संगीता लोहीया माहेश्वरी मंडल अध्यक्ष, ओमप्रकाश राठी सचिव , लक्ष्मिकांत गांधी महेशसेवा समिती अध्यक्ष -चंद्रकात बागडी, सचिव प्रकाश मुंदडा, हरगोविंद चांडक, नंदू सोनी, संतोष चांडक नी केले.

Copyright ©