यवतमाळ सामाजिक

पत्रकारांनी पत्रकारीतेसोबत आरोग्यही जपावे- जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साळवे.

 

यवतमाळ :

पत्रकारांचे जीवन हे अतिशय धावपळीचे आहे, त्यांना वेळेचे बंधन रहात नाही. जिथे घटना तिथे पत्रकारांना पोहोचावे लागते, अशा स्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परंतु सामाजिक भान जपत असताना पत्रकारांनी स्वतःचे आरोग्य देखील जपणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साळवे यांनी केले. स्थानिक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघ संलग्नित यवतमाळ जिल्हा श्रमिक पत्रकार ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किशोर जुननकर तथा प्रमुख पाहुणे म्हणून श्रमिकचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश राऊत, जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे, रघुवीरसिंह चौहान यांच्यासह यवतमाळ श्रमिक पत्रकार ट्रस्ट चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव सुरेंद्र राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. पुढे बोलताना मनीषा साळवे म्हणाल्या पत्रकारांना पत्रकारीता करतांना रात्रंदिवस एकसमान असतो़, कुठली घटना घडली, अथवा अपघात झाला त्या ठिकाणी तात्काळ आपण पोहचतो़ अशा स्थितीत आपली वेळ निश्चिती नसते़ वेळी, अवेळी दिनचर्येतील बदलामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो़, त्यामुळे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांनी आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प करावा जेणेकरून आपण समाजासाठी जी पत्रकारीता करत आहो, ती अधिक उत्तमपणे करू, असे संबोधीत केले़
त्यानंतर कार्यक्रमात अध्यक्ष किशोर जुनूनकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला़
यवतमाळ श्रमिक पत्रकार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत राऊत यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या़ तर प्रास्ताविक सुरेंद्र राऊत यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन रूपेश उत्तरवार तर आभार घनश्याम वाढई यांनी मानले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश बयास, नागेश गोरख, लक्ष्मणलाल खत्री, लक्ष्मीकांत भागवत, विजय बुंदेला, विरेंद्र चौबे, किरण कोरडे, उदय नावडे, मयूर वानखडे, सुकांत वंजारी, मनीष जामदळ, समीर मगरे, जयंत राठोड, चेतन देशमुख, दीपक शास्त्री, शाकीर अहमद, अंकुश वाकडे, सतीश बाळबुधे, वासू आहुजा, ज्ञानेश्वर ठवकर, ओंकार चेके, डॉ गणवीर,
गोडंबे गुरूजी, अभय पापळकर, सचिन झिटे, आदींसह माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

पृथ्वीगिर गोसावी यांना अभिवादन

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले पत्रकार म्हणून पृथ्वीगिर गोसावी यांची ओळख आहे. येथील गेडाम नगर स्थित शिवाजी शाळेचा बाजूला त्यांची स्मृतिस्थळ आहे. नुकतेच या स्मृतिस्थळाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्मृतिस्थळाचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी श्रमिक पत्रकार ट्रस्टने केली होती. याच पार्श्वभूमीवर श्रमिक पत्रकार संघटनेने पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सचिव तथा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

Copyright ©