यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

वसुंधरा फाऊंडेशन कडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

प्रतिनिधी
महिलाना ज्यांनी शिक्षणाच्या प्रव्हात आणले अशा त्या सावित्री बाई फुले त्यांना शत शत नमन ,,,आम्ही साऱ्या सावित्री,, या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात वाघाडी येथे जयती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात माधुरी कोटेवार/चौधरी यांनी मुलीनं सोबत वेगवेगळे खेळ व कृती गीत घेतले. वसुंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष सौ. वर्षा पडवे यांनी सावित्री बाई फुले यांच्या बद्दल मार्गदर्शन केले.वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून यवतमाळ येथील अनया निशांत मस्के यांच्या परिवार कडून 1 महिना पुरेल एवढा किराणा घेऊन देण्यात आला. व सर्व लहान मुलींना नाश्ता व केक कापून नवीन वर्ष व सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली.या कार्यक्रमाला सौ वर्षा पडवे, माधुरी कोठेवार चौधरी जया सलुजा,योगिता मासाल,प्राजक्ता मानकर, नेहा शर्मा,साची शर्मा तसेच अनया मस्के यांचा परिवार उपस्थित होते.

Copyright ©