यवतमाळ सामाजिक

स्वातंत्र्य चळवळीत पत्रकारांची भुमिका फार मोलाची।प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख।।

प्रतिनिधी : राळेगाव

।।। ब्रिटिशांच्या विरोधात जनमानसात असंतोष निर्माण करून राष्ट्र भावना जागृत करण्याचे काम पत्रकारांनीच केले. आजही भारतीय लोकशाहीत प्रसार माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची असून. जनसामान्यांच्या प्रश्न, समस्यांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारच करीत आहे म्हणूनच माध्यमांना लोकशाहीचा चौथा खांब म्हटल्या जाते स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा पत्रकारांची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे असे प्रतिपादन वक्ते प्रवीण देशमुख यांनी केले।।।राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबोधनपर कार्यक्रम नगरपंचायतीच्या प्रांगणात घेण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून देशमुख बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजेश काळे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्राचार्य डॉ अशोक उईके ,पोलीस निरीक्षक संजय चौबे ,नगराध्यक्ष रवींद्र शेराम , ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ओंकार चेके, पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे ,उद्योजक संजय काकडे,उपनगराध्यक्ष जानराव गिरी,व्ही सी एम संचालक अरविंद वाढोनकर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालिका वर्षा तेलंगे ,यवतमाळ अर्बन बँक संचालक ऍड प्रफुल्ल चौहान,जिल्हा परिषद सदस्य उषा भोयर,डॉ कुणाल भोयर,सरपंच राजेंद्र तेलंगे आदी उपस्थित होते प्रवीण देशमुख पुढे म्हणाले जांभेकर, टिळक, आगरकर, डॉ. आंबेडकर यांच्या वृत्तपत्रातून सुधारनावादी चळवळीला बौद्धिक पुरविल्या जात होते. आजही विविध स्तंभ लेखक निर्भीड आणि निष्पक्षपाती पणे आपली भूमिका स्पष्ट मांडून सामान्य लोकांना न्याय मिळवून देताना दिसतात.. हे फार आशादायी चित्र आहे.यावेळी आमदार उईके यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या दिल्या तसेच आजही बदलत्या परिस्थितीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून सत्ता उलथवून टाकाचे काम वृत्तपत्रेच करीत आहे असे आमदार उईके म्हणाले अध्यक्ष राजेश काळे यांनी तालुक्यात पत्रकार भवनाची मागणी यावेळी केली तसेच आजही समाजाचे वास्तव वृत्तपत्रेच मांडत असल्याचे सांगितले यावेळी पत्रकार संघटनेचे सदस्य डॉ कैलास वर्मा यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदस्य मोहन देशमुख यांनी सूत्रसंचालन प्रा अशोक पिंपरे यांनी तर आभार प्रदर्शन तालुका पत्रकार संघटनेचे सचिव फिरोज लाखानी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका पत्रकार संघटनेच्या सर्व सदशयानी पुढाकार घेतला

Copyright ©