Breaking News यवतमाळ सामाजिक

काम न करताच अनेक कामे दाखऊन लाखो रुपये केले फस्त

चौकशीची मागणी
प्रतिनिधी हिवरी
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत,वरूड,दिघोरी येथील ग्रामसेवक,रोजगार सेवक आणि ठेकेारांकडून विकास कामे कागदो पत्री दाखऊन पैशाची उचल करण्यात आली या मध्ये आर. बी. पी.वृक्ष लागवड, चांदापुर ते वरूड,या मार्गाने केल्याचे दाखविण्यात आले,तर काही ठिकाणी शोष खड्डे दाखविण्यात आले, ग्याबियन स्टकचर बांधणे,हे सहा ठिकाणी दाखविण्यात आले मात्र हे काम कुठेच झालेले नाही, अनपड दगडी बांध,कक्ष क्र.३००,मातोश्री पादन रस्ता,दाखविण्यात आले मात्र हा रस्ता केवळ कागद पत्रावरच वास्तविक मध्ये झालाच नाही,विहीर पुनर्भरण दाखविण्यात आले ती महादेव उधेभान घोटेकर यांच्या नावानी,परंतु पुनर्भरण केलेच नाही, दिघोरि ग्रामपच्यात अंतर्गत अशा प्रकारचे कामे झालीच नसल्याने या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांचे कडे येथील ग्रामस्थानी तक्रार दाखल केले असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीघोरी,वरूड (ईजारा) यांनी केली आहे.

Copyright ©