यवतमाळ शैक्षणिक

भारती महाविद्यालय येथे फुलांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन –

प्रतिनिधी

स्व. राजकमलजी भारती कला, वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय येथे फुलांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. ए पिस्तुलकर सर यांनीभूषविले.कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. एस.व्ही.वानखडे सर उपस्थित होते तर परीक्षक म्हणून प्रा.डॉ.रूपाली टेकाडे मॅडम उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. ए.पिस्तुलकर यांनी विद्यार्थिनींना फुलांच्या विविध रांगोळीचे प्रकार यावर मार्गदर्शन केले. आपण अंगणामध्ये रोज रांगोळी काढत असतो. विविध सणांचे औचित्य साधून आपण रांगोळीचे आयोजन करीत असतो.रांगोळीच्या डिझाइन्स, त्यातील कला आणि परंपरा या दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत आपण हा संदेश पाठवीत असतो.अशा प्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थिनींना केले.तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वानखडे यांनी रांगोळीचे महत्त्व प्राचीन काळापासून सांगितले.रांगोळीचा उल्लेख रामायण , महाभारत त्याचबरोबर अनेक ग्रंथांमध्ये आढळतो. रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिकअनुभूती देतात. अशी विविध धारणा रांगोळी काढण्यामागची आहे.यातूनच आपल्याला आपल्यामध्ये असलेले सुप्त कलागुण विकसित करावयाचे असतात.अशा प्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थिनींना केले.रांगोळी स्पर्धेच्या परीक्षक डॉ.रूपाली टेकाडे यांनी विद्यार्थिनींनी काढलेल्या रांगोळीचे परीक्षण केलेआणि विद्यार्थिनींना रांगोळीचे महत्त्व समजावून सांगितले. फुलांची रांगोळी स्पर्धा ही बी.ए. भाग- एक गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींकरिता आयोजित करण्यात आली. याकरिता विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या फुलांचा, पानांचा, दिव्यांचा उपयोग रांगोळी सजविण्याकरिता करण्यात आला.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. पायल महादेव उईके, द्वितीय क्रमांक कु.पुनम राजु रौराळे तर तृतीय क्रमांक कु वैष्णवी किसन पठाडे या विद्यार्थिनींना देण्यात आला. या स्पर्धेकरिता एकूण 30 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रा. स्वाती मनवर , प्रा. कांचन मडावी, प्रा. मनीषा क्षीरसागर आणि गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

Copyright ©