यवतमाळ सामाजिक

यवतमाळच्या बाजारपेठेत ‘जोश’च्या माध्यमातून व्‍यवसायाची संधी

प्रतिनिधी

यवतमाळ दि. ६ ते ९ जानेवारी पर्यंत समता मैदानात भव्‍य प्रदर्शनी
यवतमाळ : शहरात प्रथमच भव्‍य दिव्‍य असे १२० स्टॉल विविध लागणार आहेत. यात अन्नपदार्थांसह, व्‍यावसायिक देखील समावेश आहे. अन्नपदार्थांत इतर राज्यात आपल्यापेक्षा काय वेगळे आहे? याशिवाय तुमच्या व्‍यावसायाला मार्ग दाखविणारे असे भव्‍य स्टॉल उभारण्यात आले आहे. जैन ऑर्गनायझेशन ऑफ सोशल व ह्युमिनीटी या सेवा भावी संस्थेच्यावतीने दि. ६ ते ९ जानेवारी पर्यंत समता मैदान पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथे जैन बिझनेस कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहेत.
या जैन बिझनेस कार्निवलमध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळण्याचे स्टॉल, विविध प्रकारच्या उत्पादनाचे स्टॉल, शैक्षणिक, व्‍यावसायिक, तसेच बँकिंग क्षेत्राशी निगडीत स्टॉल या प्रदर्शनीमध्ये राहणार आहेत. विविध राज्यातून विविध राज्यातून विविध प्रकारचे स्टॉल या जैन बिझनेस कर्निवलमध्ये राहणार असून यवतमाळकरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जोश फाउंडेशन यवतमाळने केले आहे.

१२० प्रकारचे विविध स्टॉल -८० व्‍यवसायिक स्टॉल- ४० फुड स्टॉल
राजस्थान, नागपूर, गुजरात, नांदेड, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील तज्ञ व्‍यवसायिकांचे स्टॉल लागणार असून यवतमाळकरांना आता इतर राज्यातील खाद्य पदार्थांची चव घेता येईल, या उद्देशाने या भव्‍य दिव्‍य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आल्याचे जैन सोशल फाउंडेशनच्यावतीने सांगण्यात आले.या वेळी
अध्यक्ष सिद्धार्थ भंसाली
महिला अध्यक्षा वर्षा सचिन तातेड,सचिव शुभम अनिल खिवसरा ,प्रोजेक्ट डायरेक्टर अर्पित जवाहर बोरा स्नेहिल बोरा खुशबू आनंद भंडारी रानू सूरज झांबड आरती मनीष खिवसरा समर्पण गांधी
दर्पण बोरा प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©