यवतमाळ शैक्षणिक

खेळ व क्रीडा स्पर्धेत तिवसाळा अव्वल

 

*तालुका/प्रतिनिधी*
*अमोल नडपेलवार*

नुकत्याच सायतखर्डा ता. घाटंजी येथे पार पडलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा तिवसाळा तालुक्यात अव्वल ठरली. बुद्धिबळ, कॅरम, लांब उडी,उंच उडी,बॅडमिंटन, टेनीक्वाईट, योगासन, लंगडी, रीले, थाळी फेक या सर्व प्रकारात विजयी होऊन तालुक्यातून सर्वाधिक गुण घेत सर्वसाधारण विजेतेपदाची मानकरी ठरली. या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे याशनी नागराजन उपविभागीय अधिकारी केळापुर, सोनाली माडकर गटविकास अधिकारी घाटंजी, सुषमा बाविस्कर ठाणेदार घाटंजी, चंद्रप्रकाश वाहने गटशिक्षणाधिकारी, विजया वैद्य विस्तार अधिकारी, छायाताई बनसोड, केंद्रप्रमुख सुनील बोंडे यांनी प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरव केला. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व मुख्याध्यापक राम भंडारवार, काशिनाथ आडे, मनोज उत्तरवार, वंदना वघरे, शरद सोयाम,अमोल डंभारे, अतुल वानखडे या सर्वांचे तालुका शिक्षण विभाग यांनी अभिनंदन केले.

Copyright ©