तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार
मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ६ जानेवारीला सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरी केली जाते त्या अनुषंगाने पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. ५ जानेवारी २०२३ रोज गुरवारला सायंकाळी ५ वाजता एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्था घाटंजी यांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, समाजप्रबोधनकार, तरुणांचे आवडते, विनोदवीर अविनाश दादा भारती घाटनांदूर जिल्हा बिड यांचे प्रबोधनत्मक व्याख्यान व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशन चौकात करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पूजा मातोडे तहसीलदार मॅडम, प्रा. शहेजाद सर प्राचार्य गिलानी महाविद्यालय घाटंजी, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सुषमा बाविस्कर ठाणेदार घाटंजी, विनोद चव्हाण ठाणेदार पारवा, अमोल माळकर मुख्यअधिकारी तथा प्रशासक नगर परिषद,रणजित जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी,
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून घाटंजी एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास कोरवते हे उपस्थित राहणार आहे. अशी माहिती घाटंजी एकता पत्रकार संस्थेचे उपाध्यक्ष कज्जूम कुरेशी व सचिव संतोष अक्कलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
—————————-
Add Comment