यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्यामंदिरामध्ये स्नेहसंमेलन हर्षोल्लासात

 

यवतमाळ (प्रतिनिधी) :

सुसंस्कार विद्या मंदिरचे १४ वे स्नेहसंमेलन वंसतराव नाईक श्रोतृगृह येथे मोठया उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बाबाजी दाते महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विवेक देशमुख सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालय वर्धेचे प्रा.प्रमोद वगरकर हे उपस्थित होते तसेच सुसंस्कार विद्या मंदिरचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा, सुसंस्कार विद्या मंदिरचे जेष्ठ मार्गदर्शक संतोषचंद्रजी लुणावत, पारसमलजी गुगलीया, उपाध्यक्ष श्री.सुनिल गुगलीया, सचिव संजय सर, सहसचिव प्रविण सुणावत के. उषा मँडम, कोषाध्यक्ष श्री मनोजजी लुणावत, सदस्य गणेशजी गुप्ता राजेश गुप्ता, ईत्यादी पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सरस्वती पुजनाने कार्यक्रमाचे सुरवात करण्यात आली,
“उडते परिंदे” ह्या शीर्षकांतर्गत संपुर्ण सादरीकरण करण्यात आले

सर्व प्रथम नर्सरीच्या विद्यार्थांनी एक तरी मोदक खा ना रे गनुबा हे गित सादर करित वातावर भक्तीमय करून टाकले,त्यानंतर केजी१ च्या चिमुकल्यांनी ख्रिसमस वर आधारित नृत्य सादर केले, केजी२च्या मुलांनी आज संडे है हे मस्ती करणारे नृत्य सादर करित सुट्टीचा मजा काय असतो ते दाखवुन दिले,त्यानंतर वर्ग २ च्या चिमुकल्यांनी गोवीयन नृत्य सादर करित सर्वांना जणु गोव्याची सहलच घडवली, हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी “उडते परिंदे” हि नाटिका सादर करित मुलांना त्यांचा मनाप्रमाणे त्यांचे करियर निवडु द्या पालक त्यांच्यावर कसा दबाव टाकतात आणि त्या नंतर होणाऱ्या परिणाम हे नाटका द्वारे सादर करित सर्वांच्या डोळ्यात अंजन घालावे असे सादरीकरण केले, ईयत्ता सातवी आणि आठवीच्या मुला मुलींनी स्वर्गीय लता मंगेशकर, आणि राजकपुर यांच्या जीवनावरील सुंदर अश्या एकापेक्षा एक सरस अस्या गाण्यांचे गायन करून श्रोत्यांना जुन्या काळात नेऊन ठेवले,ह्या नंतर विशेष असे छत्रपती शिवरायांच्या जिवनातील प्रसंगाचे सादरीकरण करतांना तानाजी द अनसंग हिरो हि उत्कृष्ट अशी अंगावर काटे आणनारी नाटीका सादर केली तेव्हा सर्व श्रोते मंत्रमुग्ध होत मुलांवर टाळ्यांच्या गजरात कौतुकाचा वर्षाव केला,ह्यानंतर
सर्व प्रमुख अतिथीच्या हस्ते मागील वर्षी इयत्ता दहावीमध्ये सर्वाधिक ९६.४० टक्के गुण प्राप्त केलेली विद्यार्थ्यांनी कु. तन्वीअतुल पेठकर हिला तिच्या गुणवत्तेबद्दल गौरवान्वित करण्यात आले,तसेच आदर्श पीटीए सदस्य म्हणून श्री अभिषेक वखरे ह्यांना शाल श्रीफळ, व सन्मापत्र देऊन गौरविण्यात आले,ह्यानंतर
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा प्रमोद वगरकर ह्यांनी मुलांना उद्देशुन बोलतांना म्हणाले मी हा कार्यक्रम बघत असतांना जणु मीच ह्या मुलांसोबत नाचतोय बागडतोय की काय असे वाटायला लागले, व मला आज माझे बालपण आठवले असे म्हणत मुलांच्या कार्यांची पावतीच दिली,
ह्या प्रसंगी अध्यक्ष प्रा.डॉ विवेक देशमुख ह्यांनी “उडते परिंदे” ह्या शीर्षकाचा धागा पकडत पालकांना मुलांना कुणावरच निर्भर न राहता आपल्या इच्छेनुसार कसे जगावे व एक आदर्श व्यक्तिमत्व कसे बनवावे ह्या बाबत मार्गदर्शन केले,ह्या संपर्ण कार्य कार्यक्रमाचे नेपथ्य सचिन निरडवार ह्यांनी केले,तसेचअहवाल वाचन,वैशाली चौधरी
संचलन दिपाली कैतिकवार,निलेश शेटे, अंजली बेगडे तर आभार प्रदर्शन ,राखी नहाते ह्यांनी केले ह्या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुसंस्कार विद्या मंदिराचे सर्व शिक्षक तसेच शालेय कर्मचारी ह्यांनी अथक परिश्रम घेतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©