Breaking News यवतमाळ सामाजिक

पत्रकार दिनी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन!

 

मराठी पत्रकारितेचे जनक खाद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 6 जानेवारीला सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने पत्रकार दिनाच्या पूर्वसध्येला म्हणजेच 5 जानेवारी 2022 रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता स्वर्गीय पी एल शिरसाठ प्रणित ग्रामिन पत्रकार संघ शाखा राळेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रबोधन शेती क्षेत्रात विविध यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या, खेळाडू विद्यार्थी सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा तसेच सायंकाळी सहा वाजता मुख्य गायिका प्रतीक्षा डांगे व सह गायक राहुल तायडे यांचा हिंदी मराठी गीतांचा स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ती म्हणून प्रसिद्ध स्तंभ लेखक न.मा. जोशी व प्रसिद्ध व्याख्याते प्रवीण देशमुख उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार रवींद्र कुमार कानडजे, गटविकासअधिकारी केशव पवार ,पोलीस निरीक्षक संजय चौबे मुख्याध्यापक मुख्याधिकारी अमोल माळकर तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश काळे हे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला समस्त जनतेनी उपस्थित राहावे असे आवाहन राळेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव फिरोज लाखांनी यांनी केले आहे’

 

Copyright ©