यवतमाळ सामाजिक

सहारा स्पोर्ट क्लबच्या वतीने व्हॉलीबॉल चे खुले सामने संपन्न.

प्रतिनिधी
स्व. डॉ.संजयजी भारती, स्व.नीलेशभाऊ मस्के , व स्व.सोमुभाऊ हेडाऊ, स्व.सागर राऊत यांच्या स्मुर्ती पित्यर्थ आर्णी येथे दिनांक 31 डिसेंबर 2022 ते 01जानेवारी 2023 या तारखेला सहारा स्पोर्ट क्लब द्वारा व्हॉलीबॉल चे सामने स्व. राजकमलजी भारती कला आणि वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ग्राउंड वर आयुजित करण्यात आले होते .या स्पर्धेत बक्षीसाची जंगी लूट करण्यात आली होती.यामध्ये प्रथम बक्षीस मा.सौ.अर्चनाताई अमोल मंगाम माजी.नगराध्यक्ष आर्णी व सगरभाऊ घोडेराव सिविल इंजिनियर यांच्या तर्फे रोख 31,000 आणि ट्रॉफी.तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस श्रीराम व्हॉलिबॉल क्लब ग्रीन पार्क आर्णी मा. श्री रनजितभाऊ राना रोख21,000 आणि ट्रॉफी तर तृतीय बक्षीस मा.श्री अतुल भाऊ वाकोडे अद्विता अरूनोदय अर्बन निधी ली बँक आर्णी रोख 11,000 चतुर्थ बक्षीस मा.श्री भिकमचदजी लोया माजी.बांधकाम सभापती आर्णी रोख 7000 रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली होती.या टुर्नामेंट मध्ये एकसे बडकर एक संघ आले होते त्या मध्ये प्रमुख संघ मुबई , अमरावती बॉईज,बालाघाट मध्ये प्रदेश, लातूर,यवतमाळ,डायमंड,शिवाजी, किनवट,जोडमोहा,मांडवी, माना,असे बरेच एकसे बडकर एक संघ मैदानात उतरले होते .
कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सौ अर्चनाताई अमोल मंगाम माजी नगराध्यक्ष नप आर्णी यांच्या हाताने उद्घाटन करून सामने चालू करण्यात आले .
प्रमुख पाहुणे…. मा. अड,सिद्धार्थ भारती साहेब, पितांबर जाधव साहेब ठाणेदार आर्णी,सगरभाऊ घोडेराव सिविल इंजिनिअर ,अतुल भाऊ वाकोडे, मा.श्री रणजित भाऊ राना , श्यामकुमारजी लोखंडे सी. ई. ओ.बालाजी अर्बन आर्णी,श्री पवणसेठ पणपलिया होते.
प्रमुख उपस्थिती…सर्व मा. अमोल मंगाम सर मुख्याध्यापक, शेखाभाऊ खंदार , भिकंमचंद जी लोया,संदीप भाऊ लोडगे,गोपळभाऊ ठाकरे, जानिभाई सोलंकी,योगेश पटेल.
मार्गदर्शक…सर्व रहिंमभाऊ शेख, प्रा.चोरडिया सर,श्री नेमाडे सर,श्री नावेद सर,श्री सुधाकर राऊत सर,श्री जावेद काझी सर,शीतल श्रिवास,डॉ हनवते,इम्रान खान,योगेश चव्हाण,निलेश राऊत,नवाज सर,प्रशांत राऊत,कुणाल जाधव, वकार शेख,निश्र्वर चव्हाण इत्यादी उपस्थित होते .
काल झालेल्या 2 दिवसीय व्हॉलीबॉल टुर्नामेंट मद्ये अतिशय अशी चुरशीची लढाईत आर्णीकरांच्या डोळ्यातील पारणा फेडणारा रोमांचक सामना पार पडला .यामध्ये सामन्याचे विशेष म्हणजे आपल्या विदर्भातील सुपुत्र माहूर तांदळा या गावचे रहिवासी सध्या मुक्काम मुबई येते कर विभागा मध्ये कार्यरत आपल्या मेहनतीच्या जोरावर तांदला ते मुबई या ठिकाणी प्रवास करीत सतत 7 वेळा नॅशनल महाराष्ट्र प्रो व्हॉलीबॉल टीम कॅप्टन मा.मुबारक भाई सय्यद यांनी आर्णी च्या धर्तीवर प्रथमतः सहारा स्पोर्ट क्लब ने मान देऊन त्यांना विनंती केली आनी आमच्या विनंतीला मान देऊन इंडिया महाराष्ट्र टॉप प्ल्येर यांचे दणक्यात आगमन झाले त्यांच्या प्रथम अगमनानिमित्य त्यांचे सहारा चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या हाताने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि अर्णीवसियाना नॅशनल प्ल्येर चा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला . विषेतः प्रथमच आर्णी व्हॉलीबॉल ग्राऊंडवर मुबारक यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या गावातील चाहते तसेच खेळाडू हजारो गावकरी तसेच त्यांचे वडील यांनी भरपूर प्रमाणात गर्दी केली होती.एकसे बडकर एक मुबारक चे व्हॉलीबॉल स्मॅश शॉट लोकांना पाहायला मिळाले .अतिशय चुरशीच्या लढतीत मुबारक याने प्रहार करीत यवतमाळ शिवाजीचा पराभव करून विजय मिळवित आनी प्रथम बक्षीस पटकाविले मुंबई gst या संघाला त्यांच्या वडिलांच्या हाताने रोख 31,000व ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय बक्षीस यवतमाळ शिवाजी या संघाला रोख 21,000 ट्रॉफी आणि मेडल सहारा स्पोर्ट मेंबर मुस्लिम सेवा संघ जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी यांच्या हाताने देऊन गौरविण्यात आले.तृतीय बक्षीस अमरावती बॉईज या संघाला रोख 11,000 ट्रॉफी श्री सुधाकर राऊत साहेब यांच्या हाताने देऊन गौरविण्यात आले.आणि चतुर्थ बक्षीस बालाघाट mp या संघाला रोख 7,000 आणि ट्रॉफी मुबारक सय्यद यांच्या वडिलांच्या हाताने देऊन गौरविण्यात आले.
इतर व्येयक्तिक बक्षीस .
बेस्ट शूटर .मुबारक सय्यद याला वॉटर फिल्टर आणि शिल्ड अमित जयस्वाल तर्फे सूरज पवार यांच्या हाताने देऊन गौरविण्यात आले .
अशा प्रकारे रात्री 3 वाजता भारती ग्राऊंडवर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला .
सामन्याचे पंच..म्हणून वकार शेख यांनी आपली उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली म्हणून त्यांना सहारा स्पोर्ट चे मेंबर निलेश राऊत यांच्या हाताने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सामने यशस्वी करण्यासाठी सहारा स्पोर्ट क्लब च्या सर्व सदस्यांनी त्यामध्ये प्रामुख्याने इम्रान खान,जावेद अली काझी,शीतल श्रिवास,निलेश राऊत,योगेश चव्हाण,सूरज पवार,अनिकेत नकाते,शुभम वानखडे,साहिलशहा,नावेद ,विक्रम ढोके,निष्वर चव्हाण,अलीम,देशमुख,सलमान खान, दिषान शेख,कुणाल जाधव,सागर सोयाम,ओम गिरी,गोविंद बिस्मोरे,इकबाल शेख,अनिकेत चौधरी, पार्थ वानखडे,गौरव टाले,ऋषी आंबेकर तसेच सर्व गर्ल व्हॉलीबॉल टीम या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©