यवतमाळ सामाजिक

यवतमाळ वनविभागाची वन क्रिडा स्पर्धा संपन्न

 

यवतमाळ वनविभागाची वन क्रिडा स्पर्धा दि. 29व30 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली . वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी दोन दिवस त्यांची क्रीडा स्पर्धा नेहरू स्टेडियम येथे घेण्यात आली . हि क्रीडा स्पर्धा उप वनसंरक्षक यवतमाळ आनंद रेड्डी येल्लू यांच्या पुढाकाराने घेण्यात आली . क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन वनसंरक्षक यवतमाळ वसंत घुले यांनी केले तर बक्षीस वितरण जिल्हाधिकारी यवतमाळ अमोल येडगे व अधिकारी यांचे उपस्थितीत झाले. क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट संघ यवतमाळ तर दुसरा संघ हिवरी ठरला . सर्वोत्कृष्ट खेळाडू लक्ष्मण भिसे हिवरी वनपरिक्षेत्र ठरला
क्रीडा स्पर्धाकरीता सहाय्यक वनसंरक्षक उत्तम फड, संदीप चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी अमर
सिडाम , शंकर मडावी , चेतन नेहारे , विनोद कोहळे , अक्षय करमलकर , चंदु गावंडे , रुदेश रोडगे , कुशल अंबाडे , प्रेरणा उईक , यांनी त्यांचे परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह वनपाल वनरक्षक वनमजूर सह सहभाग घेतला . विभागीय रीत्या क्रिडा स्पर्धा उपवनसंरक्षक आनंद रेड्डी येल्लू यांनी घेतल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .

Copyright ©