यवतमाळ सामाजिक

नगर परिषद शाळा क्रमांक २ घाटी- घाटंजी येथे नगरपरिषद स्थापनादिन व नववर्ष उत्सव साजरा

 

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी नगरपालिकेच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पालिकेचा अमृत महोत्सवी स्थापनादिन शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष न्यामुमीया देशमुख काका यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अरुण पडलवार उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये माजी खासदार व संस्थापक अध्यक्ष स्व. सहदेवजी भारती व माजी नगराध्यक्ष स्व. विठुबापूजी चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक अरुण पडलवार यांनी विद्यार्थ्यांना स्व. सहदेवजी भारती व स्व. विठू बापूजी चौधरी यांच्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली.
यानंतर वर्ग ३ चा विद्यार्थी कृष्णा उमेश माकडवार याचा वाढदिवस व नववर्ष दिन साजरा करण्यात आला . पालिकेच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त विद्यार्थी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वर्ग सजावट स्पर्धेत सहभागी झाले. शाळेतून सर्व मुलांची प्रभात फेरी शहरांमध्ये काढण्यात आली. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी लेझीम पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाची शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु. वेणूताई मेश्राम, कु. वृषालीताई अवचित , सोनूताई पेटेवार तसेच जेष्ठ शिक्षक संजय गोलर, कृष्णा मडावी, वसंत सिडाम, तुषार बोबडे, नरेंद्र राठोड , सेवक नारायण डहाके व कांचनताई मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तुषार बोबडे यांनी केले.

Copyright ©