महाराष्ट्र सामाजिक

प. पु. संत गुरुदेव रतनमुनीजी म. सा. यांचे देवलोक गमन

 

यवतमाळ ः

छत्तीसगढ प्रवर्तक अगणसंघाचे वरिष्ठ संत पुज्य गुरुदेव रतनमुनीजी म. सा. यांचे दुर्ग येथे ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी देवलोक गमन झाले. त्यांच्या देवलोक गमनाची वार्ता येथे येताच सर्वत्र शोक निर्माण झाला.
पुज्य गुरुदेव रतनमुनीजी म. सा. यांचा जन्म मुलतान नगर (वि. सं.) १९९४ रामनवमीच्या शुभ दिनी झाला. अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचे मन भगवान महावीर यांच्या प्रति आकर्षित झाले व मनात वैराग्य भाव उत्पन्न झाला. वयाचा अवघ्या १३ व्या वर्षी विक्रम संवत २००७ मध्ये योगीराज पुज्य गुरुदेव मंगल चंदजी म. सा. जवळ जैन दिया अंगीकृत करुन रतनमुनी या नावाने जैन मुनी बनले. विक्रम संवत २०२२ मध्ये आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म. सा. यांनी वाणी भूषण पदवी ने सन्मानित केले. पुज्य गुरुदेव सतीष मुनीजी, शुक्ल मुनीजी, रमण मुनीजी, आदित्य मुनीजी यांच्या समवेत ते जैन समाजात विरवाणी संयम साधना करित होते. गुरुदेवांमध्ये समुद्रासम गहराई, उच्च शिखरांची महत्ता, पृथ्वीसम क्षमाभाव, नभासारखी विशालता, कोमलता, करुणा दया भाव होता. आज अशा वरिष्ठ संताला अनेक जैन अजैन बंधु बांधव, भगिंनी त्यांच्या आशिर्वादाने मुकले आहेत. रतन मुनीजी म. सा. देवलोक गमनाने जैन समाजाची अवरणणीय क्षति झाली. गुरुदेवांच्या चरणी विनम्र श्रद्धांजली.

Copyright ©