यवतमाळ सामाजिक

संकल्प फाऊंडेशन ची हॉटेल शिवगड येथे बैठक संपन्न

प्रतिनिधी
2 जानेवारी 2023 ह्या नवीन वर्षात ,
स्थानिक यवतमाळ शहरात पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार असून,त्याकरिता जिल्हाभरातून तब्बल 26500 विद्यार्थी टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहे,किमान 22 दिवस चालणाऱ्या ह्या प्रक्रियेत सामाजिक बांधिलकी म्हणून संकल्प फाऊंडेशन च्या पुढाकाराने व यवतमाळ करांच्या सहकार्याने पुढील 22 दिवस येणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन सेवा देण्याचे ठरले आहे,ह्या तरुणाईच्या भोजनाची दाखल संकल्प घेणार हे कळल्यावर दारव्हा रोडवरील सुसज्ज हॉटेल शिवगड चे संचालक अतुल दादा कपिले ह्यांनी आपल्या *हॉटेल शिवगड* संकल्प फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची बैठक व्यवस्था करून देत ह्या उपक्रमासाठी पाहिजे ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले,संकल्प फाऊंडेशन चे वतीने अतुल दादा कपिले ह्यांचा पुष्पगुच्छ देऊन ह्या अनमोल सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला,ह्या सर्वात महत्वाच्या व मोठ्या उपक्रमासाठी मा.जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पवन बनसोड ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन असणार आहे,सोबतच अवधुतवाडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री मनोज केदारे ह्यांच्या नियोजनात समन्वय साधून संकल्प फाऊंडेशन ही भोजन सेवेची जबाबदारी पार पाडून सामाजिक दाईत्वाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहील,आजच्या बैठकीसाठी प्रलय टिप्रमवार,वसंत शेळके,अनिल तांबेकर,रवी माहुरकर,मनीष इसाळकर,नितीन माटे,रमेश राऊत,केशव बन,रामराव मोरे,मनोज तामगाडगे,गजेंद्र उन्हाळे,नितेश यादव,प्रशांत एम्बरवार,निकेश तिरपुडे,रवी कडू,राजेंद्र गावंडे,विनोद दोंदल,प्रशांत बोराडे,वीरेंद्र कलोसिया,दिपक भैसारे,राजाभाऊ देशमुख,चेतन भवरे,आकाश भारती,सागर तुमसरे,सुनील संकोचवार ,निलेश ठोंबरे,प्रीतम निकोडे, निलेश वाभिटकर,सिद्धार्थ मुजमुले,आदित्य खंदरकर, आदित्य कांबळे, नरेंद्र करमरकर, अनिकेत गोपाळे,अतुल शिखरे,संकल्प वनिता वाहिनीच्या ज्योती डब्बावार, संगीता टिप्रमवार, स्नेहल रेचे उपस्थित होत्या

Copyright ©