यवतमाळ सामाजिक

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज,निवेदने याबाबत त्वरीत कार्यवाही होणे आवश्यक असते. सदर कार्यवाहीत अधिकाधिक प्रभावीपणा, लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने, शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.

या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांची पदसिध्द विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन तर नायब तहसिलदार शिल्पा नगराळे, आणि अव्वल कारकुन वैशाली कावलकर यांची नेमणुक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जिल्ह्यातील जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने यांचेवर उचित कार्यवाही करण्यात येईल.

Copyright ©