यवतमाळ सामाजिक

वसंत घुईखेडकर यांची राज्य बॅंक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अविरोध निवड

वसंत घुईखेडकर यांची राज्य बॅंक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अविरोध निवड

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांची दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली.

गुरवारला मुंबई येथे या संस्थेची निवडणुक प्रक्रीया पार पडली.हे असोसिएशन राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ४५० अर्बन व नागरी सहकारी काॅपरेटिव्ह बॅंकांची शिखर संस्था आहे.यापूर्वी सुध्दा वसंत घुईखेडकर यांनी या संस्थेचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे.त्याचबरोबर ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद तसेच सिनेट सदस्य, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ उपाध्यक्ष आदींसह विविध पदांवर कार्यरत आहे.या निवडीचे दारव्हा,दिग्रस व नेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

Copyright ©