यवतमाळ सामाजिक

महानुभाव पंथीय श्री कृष्ण प्रभू शोभायात्रेने यवतमाळ करांचे लक्ष वेधले

महानुभाव पंथीय श्री कृष्ण प्रभू शोभायात्रेने यवतमाळ करांचे लक्ष वेधले

श्रीकृष्ण ज्ञान मंदिच्या यवतमाळ येथे भव्य रौप्य महोत्सवाचे आयोजन निमित्त शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली
प्रतिनिधी हिवरी
महानुभाव पंथीय श्रीकृष्ण ज्ञान मंदिर बोरुंदिया नगर यवतमाळ येथे 27, 28 डिसेंबर 2022 ला रौप्य महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले या वेळी अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले 27 डिसेंबरला त्रिमूर्ती मंगल स्नान विडा अवसर वस्त्र अर्पण गीता पाठ श्री पंचवतार उपहार विधी प्रारंभ व सायंकाळी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले श्री पंचकृष्ण पूजन व महाआरती पूजन विधी दुपारी 2 वाजता यवतमाळ शहरांमध्ये भव्य शोभा यात्रेच्या आयोजन करण्यात आले यात पंजाबीभांगडा,मथुरा येथून सूदामा पथक लक्ष वेधी ठरले असून ही शोभायात्रा हनुमान आखाडा गांधी मार्केट शहर पोलीस स्टेशन नेताजी चौक दत्त चौक जुने बस स्थानक लाठीवाला पेट्रोल पंप राऊत नगर या मार्गे मार्गक्रमण करीत श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे समारोप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परम पूज्य महंत श्री विजयराजदादा पंजाबी जवळा ( खांड) व हेमंत राज दादा बांधकर यांनी केले प्रस्ताविक परमपूज्य श्री पू. निलेशदादा बिडकर यांनी केले यावेळी
उपाध्य कुलाचार्य परमपूज्य महंत श्रीवर्धनस्थ बिडकर बाबा रणाईचे अध्यक्ष अखिल विश्व महानुभाव परिषद ,कवीश्वर कुलाचार्य विध्वंस बाबा फलटण, अध्यक्ष अखिल भारतीय महाराष्ट्र परिषद कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य महंत श्री कारंजेकर बाबा अमरावती, व इतर अनेक आचार्य संत,महंत या ठिकाणी उपस्थित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन महंत रेवेराजबाबाशास्त्री दिल्ली, महंत धनंजय दादा पंजाबी त. ममताताई पंजाबी त.नीलम दीदी बिडकर यांनी केले आहे या भव्य दिव्य कार्यक्रमास राज्यातून अनेक संत महंत आचार्य उपस्थित होते,या शोभा यात्रेचे संयोजन ओंकार चेके यांनी केले आहे.

Copyright ©