यवतमाळ शैक्षणिक

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा

घोटी येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यालयात सहशालेय उपक्रमांतर्गत संत सेवालाल जयंतीचे औचित्य साधून सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले वर्ग 5 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांत अ व ब गटात ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली यावेळी एकूण 437 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव श्री. मुकुंद प्र. कदम ,लोभा दत्ताजी जाधव , ग्रामपंचायत सदस्य पवन चव्हाण , आदर्श साऊंड सिस्टिम , माजी सरपंच मोहनराव राठोड, विनोद बळीराम आडे आदींनी अनेक पारितोषिके दिली. स्पर्धा परीक्षेच्या युगात विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे परिसरात पालकांकडून शाळेचे कौतुक केले जात आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यात शाळेचे मुख्याध्यापक . श्री . बी. जी. मेश्राम व शाळेतील शिक्षक व समस्त कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Copyright ©