यवतमाळ सामाजिक

माणूसधरी ग्राम पंचायत बनली भ्रष्टाचाराची कुरण खनिकर्मच्या प्राप्त निधीतून नियमबाह्य कामे निकृष्ठ दर्जाच

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

माणूसधरी ग्राम पंचायत बनली भ्रष्टाचाराची कुरण निकर्मच्या प्राप्त निधीतून नियमबाह्य कामे निकृष्ठ दर्जाच

घाटंजी.तालुक्यातील आदिवासी बहुल पेसा असलेल्या माणूसधरी ग्राम पंचायती मध्ये विकास कामाच्या नावावर अनेक योजनेतील निधीतून धातुर मातुर कामे करून जास्तीत जास्त पैसा वाचविल्या जात असून खनिकर्म विभागाकडून प्राप्त निधीतून निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी केले असून जणूकाही माणूसधरी ग्राम पंचायत भ्रष्टाचाराचे कुरण बनले की काय? असे वास्तव निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत माणूसघरी अंतर्गत आदिवासी बहुल जनता वास्तव्यास असून, येथील गाव पेसा अंतर्गत आहे. सरपंच व उपसरपंच यांचे पती जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेवून या ग्रामपंचायत मधील निधीचा कोणालाही विश्वासात न घेता, ग्रामसेवकाला हाताशी धरून ग्रामपंचायतला शासनाकडुन मिळालेल्या निधीचा गैरवापर करून, सदर निधी गावाच्या विकासा करीता न वापरता स्वतःच्या आर्थीक लाभाकरीता उपयोग करीत आहे. त्यामध्ये खालील प्रमाणे निधीचा समावेश आहे खनिकर्म विभागाकडून ग्रामपंचायत माणुसधरीला २५ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला. परंतु सदर निधी हा गावातील ग्रामसभा किंवा मासिक सभेमध्ये ठराव न मांडता बोगस ठराव जोडुन तो रस्त्याकरीता वापरला आहे. या मागील त्यांचा हेतु असा आहे की, सदर रस्ता तयार करतांना या निधीतुन त्यांना जास्तीचा आर्थीक लाभ झाला आहे. सदर रस्ता हा कुठलाही खोदकाम न करता रस्ता तयार केला आहे. त्यामुळे इथे सुध्दा त्यांनी स्वतःच्या आर्थीक लाभाकरीता निशीचा गैरवापर केला आहे.तसेच खनीकर्म विभागाकडुन प्राप्त निधीतून गावाकरीता आरो मशिन कुणालाही विश्वासात न घेता तसेच बोगस ठराव घेवून परस्पर विकत घेतली आहे.
सदर खनिकर्म विभागाचा निधीचा पदभार हा तत्कालीन सचिव गुल्हाने यांचेकडे असुन, वि. सचिव मालखेडे यांनी नविन खाते उघडुन सदर निधीचा घोळ केला आहे १४ वा वित्त व १५ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात अफरातफर करण्यात आलेली आहे. सदर दोन्ही आयोगातील निधी सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन्ही आर्थीक वर्षातील निधीचा समिती स्थापन करून योग्य ती चौकशी करण्यात यावी.ठक्कर बाप्पा योजनेतून प्राप्त निधीची सन २०२१-२२ व २०२२-२३ ची चौकशी करण्यात यावी. यात सुध्दा मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर झालेला आहे.. रोजगार हमी योजनेची सुध्दा योग्य ती चौकशी करण्यात यावी. माणुसधरी येथील ग्रामसेवक हे फक्त मासिक सभेशिवाय इतर कधीही गावात येत नाही. ग्रामपंचायत कार्यालयाचे त्यांचेजवळ कोणतेही दप्तर उपलब्ध नाही. माणूसघरी गावाची दोन वर्षापासून एकही ग्रामसभा झालेली नाही व मागील चार ते पाच महिन्यापासून मासिक सभा सुध्दा झालेली नाही. तसेच दोन वर्षांपासून एकही महिला सभा झालेली नाही. माणुसरी येथील करभाडे पट्टी वसुल करुन, स्वतः वापरत आहे. तरी करभाडेपट्टीची समिती मार्फत योग्य ती चौकशी करण्यात यावी ग्रामपंचायतमधील कारभाराची समिती स्थापन करुन बाब निहाय चौकशी करावी.याकरीता निवेदन घाटंजी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी माडकर मॅडम यांना देण्यात आले निवेदन देता वेळेस माणुसधरितील फार मोठया प्रमाणात महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या आणि महिलांसोबत गावकरी सुद्धा मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Copyright ©