महाराष्ट्र राजकीय

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते स्पर्धक आज दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले

 

तालुका प्रतीनीधि :-सुरेखा तळनकर

दि. २५  ः हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दिल्ली संसदभवन अभ्यास दौरा आणि इतर प्रेक्षणिक स्थळे बघण्यासाठी आज सर्व ५० स्पर्धक व जनसंपर्क अधिकारी दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंगोलीसह औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव, कळमनुरी, माहूर, किनवट, उमरखेड, हिमायतनगर, महागाव आणि हादगाव या तालुक्यातील साडेतीनशेपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील पन्नास विजेते स्पर्धक रविवारी

खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली संसद भवन अभ्यास दौऱ्यासाठी नांदेडच्या हुजूर साहिब रेल्वे स्थानकाहून दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी खासदार हेमंत पाटील व गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी रेल्वे स्थानावर हजर राहुन दिल्लीकडे निघालेल्या विजेत्या स्पर्धकांचे पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अधिक माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, वक्तृत स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात संसदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे बघता येणार आहे. वास्तूसंग्राहलय, विविध संस्थानच्या भेटी, राष्ट्रपती यांच्या देखील भेटीचा वेळ मिळाला आहे. संसदभवन परिसरासह, ग्रथालय, विज्ञान भवन, पंतप्रधान संग्राहलय यासह विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येणार आहे. विशेष म्हणजे देशाचा महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना भेटता येणार असल्याने सर्व विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पाच दिवसाच्या दौऱ्यात विद्यार्थ्यांना प्रवासा दरम्यान चहा, बिस्कीट, नाष्टा, शुद्ध पिण्याचे पाणी तर दिल्लीत पोहचल्यानंतर राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी सौ. राजश्री पाटील, बाबुराव कदम कोहळिकर, बबन कदम यांची उपस्थिती होती.

Copyright ©