यवतमाळ सामाजिक

नगर वाशियाणा लवकरच पाणी पुरवठा होणार

यवतमाळ

अमृत योजने अंतर्गत विठ्ठल वाडी परिसरातील बांधलेले पाण्याची टाकी चालू करून नागरिकांना पाणी सुविधा देण्यासाठी तसेच विठ्ठलवाडी परिसर 250 एम एम. या पाईपलाईन वर जोडने गाडगे नगर येथील दानी यांच्या घरापासून ते चवरे यांच्या घरापर्यंत 250 एम.एम. ची पाईपलाईन टाकून जोडावी अशा अनेक संदर्भात जीवन प्राधिकरण चे अधिकारी अजापुंजे तसेच सूर्यवंशी यांच्यासोबत चर्चा केली असता पुढील आठवड्यात विठ्ठलवाडी परिसरातील टाकी सुरू करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले या बाबत अनेक वेळा या बाबत मागणी करण्यात आली होती,परंतु कुणीही दखल घेतली नव्हती मात्र आज त्या पाठ पुराव्यास यश आले असून लवकरच विठ्ठलवाडी गाडगे नगर आदर्श नगर बांगर नगर कामगार नगर वंजारी फैल राजेंद्र नगर इत्यादी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरळीत पाणीपुरवठा होईल असे संबधित अधिकाऱ्यांनी विश्वास दिला यावेळी सतीश मडावी प्रेमाताई पत्रिवार अनेक नगर वाशीउपस्थित होते.

Copyright ©