यवतमाळ सामाजिक

तरुण उद्योजक आकाश गड्डमवार यांच्या कंपनीने पटकविले 10 लाखाचे प्रथम पुरस्कार

 

यवतमाळ ः

भारत सरकार अंतर्गत गुजरात सरकारने नविन इलेक्ट्री मोटर दोन, तीन व चार चाकी वाहन इलेक्ट्री मोटर्सने चालविण्याकरिता सुधारित, नविन तांत्रिक दृष्ट्या मोटर बनविण्याकरीता नविन उद्योजकाकडून इलेक्ट्रीक व्हेईकल इन्होवेशन चॅलेंज कॅम्प्स, देव ढोलेरा अहमदाबाद येथे आवेदन पत्र प्रकल्पासहीत मागवून 23 राज्यामधून 114 शहरामधून प्रकल्पाकरीता 1160 कंपनीचे आवेदन पत्र प्राप्त झाले. या आवेदनपत्रातून प्राप्त झालेल्या प्रकल्पाचे तांत्रिक समितीकडून छाननी करुन दिनांक 27/11/2022 ते 20/11/2022 पर्यंत पहिल्या राउंडमध्ये जवळपास 800 कंपनीतून 100 कंपनीची प्रकल्पाची निवड दुसर्‍या राउंडमध्ये करण्यात आली. या कंपनी दि. 17/12/2022 ते 20/11/2022 पर्यंत प्रकल्पाची छाननी करुन अंतिम फेरीमध्ये 18 कंपन्याची निवड करण्यात आली. या 18 कंपनी मधून पहिले पारितोषिक रु. 10 लाख गॅरोड्राईव्ह मशिनरी प्रा. लि. यवतमाळ (पुणे) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सदर कंपनी ही यवतमाळ, महाराष्ट्र राज्य, स्टार्टपमध्ये कंपनीची स्थापना करुन, या कंपनीचे डायरेक्टर आकाश सुर्यकांत गड्डमवार व ईशान धर हे आहेत. आकाश गड्डमवार व ईशान धर हे इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स बंगलौर येथे दोन वर्ष रिर्सचर म्हणून काम केले. तद्नंतर वरील प्रमाणे स्वतःची कंपनी सुरु केली.
सद्य परिस्थितीत इलेक्ट्रीक व्हेईकल मध्ये लागणारे साहित्य व पार्ट मॅगनेट सहित चायना देशावर अवलंबून रहावे लागतात तसेच चायना मोटर संबंधी दोन किलो मॅगनेटचे उत्पादन करतांना 96 किलो प्रदुषण वातावरणामध्ये वाढ करीत असते. सदर मोटार जास्त गरम झाली तर मोटारची कार्यशक्ती/परफार्मन्स कमी होतो. या दोन्ही वरील गोष्टीवर मात करुन आमच्या कंपनीने मॅगनेट फ्रि एनर्जीमुळे वरील दोषविरहित मोटार निर्माण करुन मोटारची क्षमता, खुपच मोठ्या प्रमाणात राहून मोटार सुस्थितीत चांगल्या प्रकारे सुरळीत चालते. त्यामुळे इलेक्ट्री मोटरच्या उत्पादनाबाबत जगभरातून प्रशंसा होत असून या मोटर्सची दखल घेण्यात आली आहे. यामुळे यवतमाळातील आकाश गड्डमवार व ईशान धर यांचे कौतुकाचे वर्षाव होत आहे.

Copyright ©