Breaking News यवतमाळ राजकीय

सावळी सदोबा येथील उपोषणाची सांगता

 

सावळी सदोबा अशिफ खान

सावळी सदोबा येथे दिनांक 20 डिसेंबर मंगळवारपासून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची सांगता दिनांक 22 डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळी झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
सावळी सदोबा व परिसरातील विविध समस्या सोडविण्यात याव्या याकरिता यवतमाळ जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर व बालाजी ठाकरे आणि विनोद जयस्वाल यांनी दिनांक 20 डिसेंबर मंगळवार पासून सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाची सांगता सावळी सदोबाचे नवनिर्वाचित सरपंच श्री. बाळासाहेब शिंदे यांच्या मध्यस्थीने आर्णी तहसीलचे नायब तहसीलदार श्री. यु.डि.तुंडलवार ,
श्री डि.जी.सुळे प्रभारी तालुका कृषी अधिकारी,
श्री मनवर साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी,
श्री.एस.डी.सप्परवार मंडळ अधिकारी,
श्री आर.वाय. इंगळे कृषी पर्यवेक्षक तथा विद्युत मंडळाचे अभियंता शाहरुख शेख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर व काही मागण्या पूर्ण केल्याबद्दल चे लेखी पत्र दिल्यानंतर ह्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी उपोषण मंडपात आर्णी पंचायत समिती चे माजी सभापती सुरेश जैस्वाल, माजी सभापती विजय पाटील राऊत नुनेश आडे, शेषराव मुनेश्वर , निसार सर्वे, गजानन जोगमोडे, सिराज सर्वे, गंगाराम कोवे, प्रकाश भोयर, भिमराव बनकर, बाबाराव मेश्राम,रवि पाटील शिंदे, रामराव राठोड, विनोद रामटेके,प्रेम जाधव, उदयसिंह चव्हाण,भावराव राठोड ,बारभाई चे सरपंच प्रदीप जाधव, शिवरचे सरपंच गणेश मासाळ, वरुडचे सरपंच नामदेव पेंदोर , बंडू वाघमोडे, प्रविण मेश्राम , घनश्याम मेश्राम,प्रविण भगत,ऊतमराव मिरासे,सुनिल चव्हाण, पंडित जाधव, राजू सर्वे, किसन नाईक चव्हाण, मधूकर राठोड , नितीन चव्हाण , पुंडलिकराव गांजरे, भिकु पाटील राठोड, नारायण मुरखे , बाबाराव मेश्राम, अमोल वाघमारे, अशोक गुंजकर, साहेबराव पुनवटकर,,प्रविण भोयर, प्रमोद कचरे , सुभाष दंडाजे,ऊकंडा चव्हाण , ज्ञानेश्वर भोयर , दिवाकर कुटाफळे, मोहन कुमरे‌ , चंद्रभान केराई, रमाबाई भगत, जयंत वंजारी,दारका गेडाम,ताई केराई,अमिना शेख, अफसाना सैय्यद, पंचफुला सोनवाने,‌सविता शिंदे,
ही मंडळी उपस्थित होती.
या उपोषणादरम्यान तीन दिवस पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री. विनोद चव्हाण तथा सावळी सदोबा पोलीस चौकीचे ठाणेदार गजानन गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळी पोलीस चौकी चे हेडकॉन्स्टेबल शाम रायके व हेमंतसिंग राठोड यांनी चोख‌ बंदोबस्त ठेवला होता.

Copyright ©